महावितरणच्या निष्काळजीपणाची चौकशी करा – शिशुपाल पटले

0
23

मोहाडी-विद्युत खांबावरील जिवंत तारा शेतात तुटून पडले असल्याने शेतात धानाची निंदाई करण्यासाठी गेलेल्या शेवंताबाई पटले यांचे स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेच्या दोन दिवस अगोदर एका ट्रकमूळे सिंगल फेज तार तुटल्याने ही जिवंत तार दोन वर्षांपासून अपूर्ण काम असलेल्या पोलच्या तारांना स्पर्श झाल्याने त्यात विद्युत प्रवाह निर्माण झाला. महावितरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे एका ३३ वर्षीय महिलेचा जीव गेला. त्यांची लहान मूले पोरकी झाली.भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये त्यासाठी सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्‍चित करून कार्यवाही करावी तसेच तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळाल्यावर शिशुपाल पटले यांनी मृतक शेवंताबाई पांडुरंग पटले यांचे कुटुंबाचे त्यांचे घरी भेट देऊन सांत्वना दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपाध्यक्ष मुन्ना पुंडे, तालुका अध्यक्ष भगवान चांदेवार, भाजप नेते रामराव कारेमोरे, पाचगावचे सरपंच संतुलाल गजभिये, माजी सरपंच बबलू रहांगडाले, उपसरपंच महेश कळंबे, तंटामुक्ती अध्यक्ष महेश पटले, शुभम रहांगडाले, अक्षय कुकडकर व गावकरी उपस्थित होते.