सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान नवे सीडीएस

0
16

नवी दिल्ली– बालाकोट हल्ल्याच्या वेळी डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ) राहिलेले आणि चीनचे जाणकार लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (सेवानिवृत्त) यांची देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) या पदावर नियुक्ती झाली आहे. ते निवृत्त झाल्यानंतर या पदावर येणारे पहिले थ्री-स्टार लष्करी अधिकारी आहेत. सध्या ते एनएसए अजित डोभाल यांच्या नेतृत्वाखालील एनएससीएसमध्ये लष्करी सल्लागार आहेत.

सुमारे १० महिन्यांनंतर सरकारने सीडीएसच्या रिक्त पदावर नियुक्ती केली आहे. पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे गेल्या डिसेंबरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर हे पद रिक्त होते. संरक्षण मंत्रालयातर्फे जारी झालेल्या आदेशात म्हटले आहे की, चौहान (६१ वर्षे) सैन्य प्रकरणांच्या विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील.