ब्रेकींग न्युज – हत्तीच्या कळपाने अर्जुनी मोरगावात एकाला चिरडले

0
245

गोंदिया,दि.04ः जिल्ह्यात प्रवेश केलेल्या जंगली हत्तींनी नवेगावबांध वनपरिक्षेत्रात इसमाचा पहिला बळी घेतल्याची घटना आज मंगळवारला (दि.4) सकाळी उघडकीस आली आहे.
नवेगावबांध वनपरिक्षेत्रातिल (तालुका मोरगाव अर्जुनी ) आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास तिडका – जब्बारखेडा गावाजवळ काही शेतकऱ्यांनी हत्तिंचा मार्ग अडवून हळकावण्याचा प्रयत्न केला, त्यातच हत्तीच्या हल्ल्यात एक व्यक्तीचा मृत्यू झाला व एक जखमी झाला आहे.या जंगली हत्तीच्या हल्ल्यात सुरेंद्र जेटू कळहीबाग (वय 52) यांचा मृत्यूू झाला आहे.तर जोरू सुंदरसिंग पोरीची(वय 50) हा इसम जखमी झाला असून राहणार तिडका येथील आहेत.
अर्जुनी-मोर तालुक्यातील तिडका या आदिवासीबहुल गावातील परिसरामध्ये मागील 29 तारखेपासून हत्तींचे वास्तव्य आहे.आदिवासीच्या उपजीविकेचे साधन म्हणून शेतीचे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.हत्तीच्पासून आपल्या शेतीचे रक्षण व्हावे याकरिता तिडकावासियांनी वनविभागाच्या सूचनेनुसार आपल्या शेतीचे रक्षण करण्यासाठी एकत्र येवून काल रात्रीला हत्तीचा कळप पळवून लावण्यासाठी डफळी,वाजे आणि मशाली पेटवून आपल्या शेतांचे रक्षण करण्याचा प्रयत्न केले.
हत्तीचा कळप त्यामुळे जंगलाच्या दिशेने पळून गेला.सकाळी जंगलातील हत्तीमुळे आपल्या शेताचेचे नुकसान झाले तर नाही या दृष्टिकोनातून पंचवीस ते तीस आदिवासी शेतकरी शेतशिवारामध्ये गेले असता लोकांचा समूह पाहून आराम करत असलेल्या हत्त्यांनी अचानक गावकऱ्यांवर हल्ला केला. सदर हल्ल्यामध्ये एक आदिवासी शेतकरी जागेवरच मृत पडला तर एक शेतकरी जखमी झाला. सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले व पोलिसांच्या मदतीने मृतदेह नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता घेऊन आले. जखमी व्यक्तीला सुद्धा नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आलेले आहे .
सदर घटना घडत असताना वन विभागाचे काही कर्मचारी घटनास्थळावर उपस्थित होते मात्र वनविभागाचे कर्मचारी पडून आल्याचा आरोप या प्रसंगी गावकऱ्यांनी केलेला आहे. या पळून आलेल्या कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा गावकऱ्यांनी केलेली आहे .