स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी गांधी जयंती दिनी सम्पूर्ण विदर्भात आत्मकलेश आंदोलन

0
12

03 ऑक्टोबरला प्रधानमंत्री व गृहमंत्री याना निवेदन

गोंदिया:- विदर्भ राज्य आंदोलन समीती व वेगळ्या विदर्भासाठी समर्थन देणा-या सर्व राजकीय सामाजिक धार्मिक व्यापारी कर्मचारी संस्था यांच्या संयुक्त विद्दमाने विदर्भातील जनतेने वेगळ्या स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन पुकारले आहे. सप्टेंबर व आक्टोबर महीण्यात सरकारचे, व्यवस्थेचे आमदार खासदार यांचे लक्ष वेधण्यासाठी.
दि.28/9/2022 रोजी नागपूर कराराची संपूर्ण विदर्भात होळी करून शाशन प्रशासन व्यवस्था व जनतेचे लक्ष वेधले. हा करार म्हणजे विदर्भातील जनतेला धोका देणारा फसवा करार ठरलेला आहे. त्यामुळे हा करारच जनता नाकरत आहे हा संदेश आम्ही व्यवस्थेला दिला आहे. याला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतीसाद मीळाला आहे. त्याचप्रमाणे
दि.2ऑक्टोबर गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. विदर्भासाठी तन मन धन अर्पण करणा-या कार्यकर्त्यांनी दिवसभर उपवास करून स्वतःला क्लेष दुःख देऊन शांततेच्या मार्गाने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जेणेकरून समोरच्या व्यक्ती च्या मनात दया प्रेम करुणा न्यायाप्रती आत्मभान जागृत होईल व आमची स्वतंत्र विदर्भाची मागणी करतील
2 ऑक्टोबर 2022ला सरकारी सुट्टी असल्याने 03 ऑक्टोबर ला पंतप्रधान व गृह मंत्री यांच्या नावाने निवेदन एसडीओ. कलेक्टर कार्यलयामार्फत केंद्र सरकारला पाठविण्यात आले. गोंदियात निवेदन नायब तहसीलदार चवरे यानी स्विकारले.
विदर्भाचे वेगळे स्वतंत्र राज्य निर्माण होईपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे. यानंतर आमदार खासदार यांना विदर्भाविषयी आपली भुमिका काय याची विचारणा करणार आहोत. खासदारानी सकारात्मक भुमिका घेऊन आंदोलनला पाठींबा दिला नाही तर विदर्भातील जनता त्याना मतदान करणार नाही. यासाठी आम्ही जनजागृती करून ते महाराष्ट्र प्रेमी आहेत तर विदर्भाच्या बाहेरूनच निवडून यावे. अशी विदर्भ वाद्यांची भुमिका राहील. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार अॅड.वामनराव चटप अरूणभाऊ केदार रंजनाताई मामर्डे मुकेशजी मासुरकर प्रकाश जी पोहरे पत्रकार कोंडबतुनवार साहेब खांदेवाले चक्रवर्ती साहेब तसेच माजी मंत्री रमेश गजबे तसेच बहुसंख्य विदर्भातील नेते मंडळी करीत आहेत.
गोंदिया जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ते अतूल सतदेवे, वसंत गवळी सी.पी .बीसेन, सुनील भोंगाडे, रवी भांडारकर, बोरकर लीमये, सीध्दमसेट्टीवार, राऊत, अग्रवाल, ठवरे, बावनकर, गेडाम, क्षिरसागर, ब्रम्हे, शेंडे, उके, मेश्राम, मानकर, पालेवार, शेख, चौधरी, बडोले, बडगे, तसेच जेष्ठ नागरिक मीत्र मंडळ, संविधान मैत्री संघ तसेच विदर्भ प्रेमी सर्व पक्षांनी पाठींबा दर्शविला आहे.