सरकारी बॅंका उद्या बंद राहणार

0
13
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई – सरकारी बॅंकांतील कर्मचारी व अधिकारी यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा व्हावी तसेच वेतन हे महागाईशी सुसंगत असावे या आणि अशा मागण्यांसाठी देशभरातील बॅंक कर्मचाऱ्यांचा सध्या साखळी पद्धतीने विभागशः संप सुरू आहे. यामध्ये देशाच्या पश्‍चिम क्षेत्रातील बॅंक कर्मचारी 5 डिसेंबर रोजी (शुक्रवारी) एक दिवसाच्या संपावर जात आहेत. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांसह दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सने नियोजित संपाची हाक दिली आहे. या फोरममध्ये बॅंक कर्मचाऱ्यांच्या अखिल भारतीय स्तरावरील नऊ संघटना सहभागी आहेत. इंडियन बॅंक्‍स असोसिएशनने केंद्रीय अर्थ मंत्रालयाबरोबर झालेल्या चर्चेतून 11 टक्के वेतनवाढ निश्‍चित केली आहे. ही वेतनवाढ युनायटेड फोरमला मंजूर नाही. त्याविरोधात हा संप पुकारण्यात येत आहे.