मुंबई-टाटा समुहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. राज्यातील सुमारे एक कोटी मुलांचा शिक्षणातून सर्वांगीण विकासाचा प्रकल्प सामाजिक उपक्रमात सहभाग (सीएसआर) या योजनेंतर्गत, टाटा समुह सुरू करीत आहे. या उत्कृष्ट उपक्रमात राज्य शासनाने सहभागी व्हावे अशी इच्छा मिस्त्री यानी मुख्यमंत्र्याकडे व्यक्त केली.विशेष म्हणजे असे उपक्रम शासनाने राबवायचे असतात परंतु टाटा समुहाने पुढाकार घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यानी त्यांचे अभिनंदन करीत सरकार या उपक्रमात भागीदाराची भूमिका बजावेल, असे जाहीर केले.