निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ:उद्धव ठाकरेंची प्रखर टीका

0
8

औरंगाबाद-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार हे केवळ उत्सव प्रिय सरकार असून शेतकऱ्यांप्रती शिंदे यांचे सरकार अतिशय निर्दयीपणे वागणूक करीत आहे, त्यांच्याकडे भावनांचा दुष्काळ असल्याची प्रखर टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते आज औरंगाबाद दौऱ्यावर होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गंगापूर तालुक्यातील दहेगाव या गावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या गावात किशनराव धोडे यांच्या शेतीची ठाकरेंनी पाहणी केली. ‘तुम्ही धीर सोडू नका, मी तुमच्या सोबत आहे’, असा धीर ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला.

अजून पंचनामेच नाहीत

दहेगाव येथील शेतकरी किशनराव धोडे यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले की, माझी सहा एकर शेती आहे. अतिवृष्टीमुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतातील कापूस, मका, मिरची या पिकांचे मोठे नुकसान झाले. तर, गावात अजून शेतीचे पंचनामेच झाले नसल्याची माहिती दहेगावचे सरपंच विक्रम राऊत यांनी उद्धव ठाकरेंना सागितले.

बँकांच्या नोटीसांचा तगादा

शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, मी तुमच्या सोबतच आहे. मी आता मुख्यमंत्री नाही. मात्र, तुमच्यामुळेच कोरोना काळात अर्थव्यवस्था सुधारली. यावेळी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आम्हाला बँकांच्या नोटीसा येत आहेत, अशी कैफियत ठाकरेंसमोर मांडली. त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मविआ सरकारने दिलेल्या कर्जमाफीमध्ये तुमचे कर्ज माफ झाले की नाही, अशी विचारणा केली. तसेच संकट येतात मात्र तुम्ही धीर सोडू नका, असा धीरही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.सध्या पेंढापूर येथील शेतकऱ्यांच्या उद्धव ठाकरे भेटी घेत आहेत.

औरंगाबाद विमानतळावर जोरदार स्वागत

दुपारी एक वाजेच्या सुमारास उद्धव ठाकरे यांचे औरंगाबाद विमानतळावर स्वागत झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. उद्धव ठाकरेंचे विमानतळावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ठाकरेंचे स्वागत केले.

नुकसान भरपाई द्या

पेंढापूर, ता. गंगापूर येथे उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावे अशी मागणी केली.दहेगाव आणि पेंढापूर मधली परिस्थिती पाहिल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळते मात्र तरीही कृषिमंत्री ओल्या दुष्काळाचा निकषाबाबत बोलत आहेत. ओला दुष्काळाचा नेमका निकष काय आणखी चिखलात बुडवून काढायची आहेत का पिके असा सवाल देखील त्यांनी केला.

नुकसान भरपाई चे निकष बदला

ठाकरे म्हणाले, आमच्या काळात एनडीआरएफचे निकष बदलण्यात आले होते. जनतेची मागणी हेक्टरी 50 हजार रुपये इतकी आहे आमचा त्याला पाठिंबा असल्याचे ठाकरे यांनी सागितले.

मी रस्त्यावर उतरणार

ठाकरे म्हणाले, शेतकऱ्याचे प्रश्न बाबत बोलताना ठाकरे म्हणाले की शेतकऱ्याच्या प्रश्नावर आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगत या सरकारला पाझर फुटत नसेल तर तर त्यांना घाम फोडेल.

घोषणांची अतिवृष्टी

ठाकरे म्हणाले, घोषणाची अतिवृष्टी करणाऱ्यासरकारकडे भावनांचा दुष्काळ असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.हे सरकार उत्सवात मग्न आहे असे त्यांनी सांगितले .तसेच हा दौरा केवळ प्रातिनिधिक असून पुन्हा परत येणार आहे.

फडणवीसांवर टीकास्त्र

​​​​​​​ठाकरे म्हणाले की, फडणवीस यांनी पुण्यात पाऊस पडला तर मनपाला विचारून पाऊस पडत नाही असे सांगितले. तसेच आता ग्रामीण भागात पाऊस पडला तर आम्हाला विचारून पडला नाही असे म्हणतील, त्यांच्याकडे सर्व गोष्टींचे उत्तरे असतात.