७७५१ ग्राम पंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला ; कार्यक्रम जाहीर

0
27

 गोंदिया,दि.09- राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.यामुळे राज्यात पुन्हा एकदा रणधुमाळी पहायला मिळणार आहे.ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींची ही निवडणूक होणार आहे.२८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरु होणार असून १८ डिसेंबरला मतदान,२० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. महत्वाचे म्हणजे ७७५१ ग्रामपंचायतींचे सरपंच हे थेट जनतेतून निवडले जाणार आहे. काही महिन्यां पूर्वी 1 हजार 165 ग्रापंचायतीं मध्ये निवडणूक झाली होती.gp election prog 09112022