भुजबळ यांची १४ मार्चला होणार चौकशी

0
10

मुंबई-महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आरोपपत्र दाखल केल्यानंतर दोन आठवड्यांत सक्तवसुली संचालनालयाने राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना चौकशीसाठी समन्स काढले आहे. या समन्सनुसार भुजबळ यांना १४ मार्च रोजी सक्तवसुली संचालनालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सक्तवसुली संचालनालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत.