ओबीसींच्या मागण्यासाठी जंतरमंतरवर धरणे

0
11

नवी दिल्ली,दि.९-ऑल इंडिया ओबीसी एमप्लाईज फेडरेशनच्यावतीने आज बुधवारला सकाळी १० वाजेच्या सुमारास जंतरमंतर येथे धरणे आंदोलन करून सरकारचे ओबीसी समाजाच्या समस्या व मागण्याकंडे लक्ष वेधण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व ऑल इंडिया ओबीसी फेडरेशनचे अध्यक्ष खासदार व्ही.हनुमंत राव यांनी केले.यांच्यासोबत माजी मंत्री व्ही नारायणसामी,एस.के.खरवंतन,डॉ.शकील अज झमन अन्सारी,खासदार हुकूम देव नारायण यादव,खासदार तिरुची शिवा,खासदार बी.के.हरिप्रसाद,खासदार टी.देवेंदर गौड,खासदार अली अनवर अन्सारी,खासदार डॉ.बोरा नरqसम गौड,खासदार अनुप्रिया पटेल,खासदार राजकुमार सैनी आणि रासपचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर सहभागी झाले होते.या आंदोलनात महाराष्ट्रातील ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी सुध्दा सहभागी झाले होते.विदर्भातील नेतृत्व चंद्रपूर ओबीसी कृती समितीचे संयोजक सचिन राजूरकर यांनी केले.या आंदोलनात ओबीसीवर लादण्यात आलेली क्रिमीलेयरची अट रद्द करण्याची मागणी जोरदारपणे मांडण्यात आली.