24.5 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home Top News मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल

0
32

मुंबई:-मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबईत ‘एसआरए’ संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध वांद्रे येथील निर्मल नगर पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे.मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली.

“मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि त्यांचे कुटुंब आणि किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात गोमाता जनता एसआरए वरळी येथे कथित फसवणूक, बनावटगिरी प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे,”अशी माहीती मुंबई पोलिसांनी सांगितले.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत फसवणूक आणि बनावट कागदपत्रे केल्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर बीएमसीकडून कारवाईही करण्यात आली होती.त्याचवेळी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किशोरी पेडणेकर यांचे वरळीतील गोमाता नगर येथील कार्यालय आणि घर सील करण्यात आले. बीएमसीने एसआरए कायद्यांतर्गत त्यांचे घर आणि कार्यालय सील केले होते.