‘सुखोई-मिराज’ची हवेत टक्कर, 1वैमानिक ठार:ग्वाल्हेरवरून उड्डाण, मुरैनात धडकले तर सुखोई 90KM दूर भरतपूरला कोसळले

0
12

हवाई दलाच्या सुखोई-30 व मिराज-2000 या दोन लढाऊ विमानांची शनिवारी सकाळी हवेत धडक झाली. दिव्य मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, धडकेनंतर ही दोन्ही विमाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी पडली. एक विमान मध्य प्रदेशातील मुरैनात, तर दुसरे राजस्थानच्या भरतपूर येथे कोसळले.

मिराजमध्ये एक आणि सुखोईमध्ये दोन पायलट होते. यातील एका वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. मात्र, हवाई दलाने अद्याप याची पुष्टी केली नाही. मृत पायलट कोणत्या विमानाचा होता हे ही अजून स्पष्ट झालेले नाही. हवाई दलाने केवळ ही दोन्ही विमाने नियमित सरावासाठी आकाशात झेपावल्याचे म्हटले आहे.

मुरैना जिल्हाधिकारी म्हणाले – तीनपैकी दोन पायलटला वाचवण्यात यश
मुरैनाचे एसपी आशुतोष बागरी यांनी दिव्य मराठीला सांगितले की, ग्वाल्हेर एअरफोर्स स्टेशनवरून हवाई दलाच्या दोन विमानांचे टेकऑफ झाल्याची माहिती मिळाली होती. यापैकी एक पहाडगडमध्ये कोसळले आहे. दुसरे विमान मानपूरजवळ कोसळल्याची माहिती आहे. आम्ही दुसऱ्या विमानाचा शोध घेत आहोत.

मुरैना जिल्हाधिकारी अंकित अस्थाना यांच्यानुसार, तीनपैकी दोन पायलट वाचले आहेत. त्याची छायाचित्रेही दिव्य मराठीकडे येत आहेत. मात्र घटनास्थळावरून अशी काही छायाचित्रे मिळाली आहेत, ज्यावरून कुणाचा तरी मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भरतपूरचे डीएसपी म्हणाले – सकाळी 10 ते 10.15 वाजेपर्यंत माहिती मिळाली होती

राजस्थानमधील भरतपूरचे डीएसपी अजय शर्मा म्हणाले- आम्हाला सकाळी 10 ते 10.15 च्या सुमारास विमान अपघाताची माहिती मिळाली होती. घटनास्थळी आल्यानंतर हे हवाई दलाचे लढाऊ विमान असल्याचे आढळून आले. मात्र, अवशेष पाहून ते कोणत्या लढाऊ विमानाचे आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. आतापर्यंत त्याच्या पायलटबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.

पहाडगड येथे अपघातस्थळावरून पायलटचा हात आढळला
मुरैना येथे पडलेल्या सुखोईमधील दोन्ही पायलट जखमी झाले आहेत. त्यांना ग्वाल्हेरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुरैना येथील पहाडगड येथे अपघातस्थळावरून पायलटचा हातही सापडला आहे. हा हात भरतपूरमध्ये पडलेल्या मिराज विमानाच्या पायलटचा असावा, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मुरैनाचे एसपी आशुतोष बागरी यांनी दिव्य मराठीला सांगितले की- ‘मानवी शरीराचा हा भाग कोणाचा आहे, याबद्दल काहीही सांगता येणार नाही.’

अपघाताशी संबंधित अपडेट्स

  • हवाई दल प्रमुखांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना अपघाताची माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी दोन्ही लढाऊ विमानांच्या वैमानिकांविषयी विचारले आहे. तसेच, ते संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत.
  • सुखोई-30 मध्ये दोन पायलट आणि मिराज 2000 विमानात एक पायलट असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुरैना येथील पहाडगड येथे अपघातस्थळावरून पायलटचा हातही सापडला आहे.
मुरैना येथील पहाडगड येथे अपघातस्थळावरून पायलटचा हातही सापडला आहे.

खालील फोटो मुरैना आणि भरतपूर येथील अपघात स्थळांची आहेत, परंतु कोणता फोटो कुठला आहे हे सध्या ठरवणे कठीण आहे…

आकाशातच लागली आग

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमानाला आकाशातच आग लागली आणि ते पाहता-पाहता जळणारे फायटर जेट खाली पडले. घटनास्थळाजवळ रेल्वे स्थानकही आहे.