राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजिनामा मंजूर रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त

0
35

️तर देशामध्ये १३ राज्यपाल व उपराज्यपाल बदलले

*मुंबई:-छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार काढणं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच भोवलं आहे. या विधानावरून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला होता. कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे.

वादग्रस्त वक्तव्यांमुळे स्वत:ला आणि सरकारला सातत्याने अडचणीत आणणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. काही दिवासंपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आपल्याला राज्यपाल पदावरुन पायउतार व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती.

गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्यं केल्यामुळे कोश्यारी अडचणीत आले होते. त्यामुळे विरोधकांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्याजागी रमेश बैंस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून सूत्रे स्वीकारतील.