“आमची शाळा आदर्श शाळा उपक्रमात गोंदिया तालुक्यात खर्रा शाळा प्रथम “

0
26

गोंदिया,दि.12ः- तालुक्यातील एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रातील आदिवासी दुर्गम भागात असलेली पण शैक्षणिकरित्या अतिशय प्रगत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खर्रा शाळेला आमची शाळा आदर्श शाळा उपक्रमात गोंदिया तालुकास्तरीय मूल्यांकन समितीद्वारे प्रथम क्रमांक देण्यात आले. ही क्षेत्रासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. यासाठी अवोरात्र परिश्रम घेणारे शाळेतील मुख्याध्यापक नरेंद्र गौतम व त्यांचे सर्व शिक्षकवृंद यांनी केलेल्या कार्याची पावती आहे.
आता ही शाळा जिल्हा स्पर्धेसाठी सज्ज व्हावी म्हणून मनीष अग्रवाल गोंदिया यांच्या तर्फे सौ.अश्विनीताई पटले जिल्हा परिषद सदस्य व सौ.वंदनाताई पटले पंचायत समिती सदस्य यांच्या माध्यमाने शाळेला डिजिटल करण्याकरीता सॅमसंग कंपनीचा स्मार्ट टीव्ही देण्यात आले.तसेच ज्यांनी खूप सक्षमतेनी यात सहभाग घेतला असे ग्राम पंचायतीचे सरपंच विकास शेंद्रे ,उपसरपंच सौ.संगीताताई किसाने सर्व ग्रापंचायतीचे सदस्यगण,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मेघराज पटले ,उपाध्यक्ष सौ.अर्चनाताई पालांदुरकर , सर्व सदस्यगण तसेच पालक वर्ग या सर्वांनी केलेल्या कार्यासाठी खूप खूप अभिनंदन करण्यात येत आहे.