क्रिकेटचा देव ताडोबात! सचिनला माया, तारा, बिजली अन् ‘बघिरा’चे दर्शन…

0
30

चंद्रपूर : क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तीन दिवसांपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मुक्कामी आहे. या तीन दिवसात सचिनला माया, तारा, बिजली या वाघिणींचे आणि ‘बघिरा’ अर्थात काळा बिबट्याचे दर्शन झाले. झुनाबाई या वाघिणीच्या दर्शनाची मात्र सचिनला प्रतीक्षा आहे.

ताडोबा अभयारण्यातील वाघांचे सेलिब्रिटींना मोठे आकर्षण आहे. यामुळे व्याघ्र दर्शनासाठी भारतासह जगभरातील सेलिब्रिटी दरवर्षी ताडोबात येतात. कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचा चाहता सचिनदेखील ताडोबातील वाघांचा मोठा फॅन आहे. सचिनने शनिवार व रविवारी ताडोबात सफारी केली. यावेळी त्याला तारा, माया, बिजली व काळा बिबटचे दर्शन झाले. झुनाबाईचे विशेष आकर्षण असल्याने सचिन तीन दिवस ताडोबा मुक्कामी आहे. त्याच्यासमवेत पत्नी अंजली तेंडुलकर व काही मित्रदेखील आहेत. सचिनने दोन दिवसांपूर्वी उमरेडजवळील करांडलामध्ये सफारी केली. त्या ठिकाणी त्याला वाघांचे दर्शन झाले. मात्र, झुनाबाईच्या प्रेमात असलेला सचिन तेथून थेट ताडोबात दाखल झाला. सचिन सलग तिसऱ्या वर्षी ताडोबा सफारीसाठी आला आहे. रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मदनापूर गेटवरून सचिनने सफारी केली. यावेळी त्याला तारा वाघिणीचे तिच्या दोन बछड्यासह दर्शन झाले. तसेच अस्वलही पहाता आले. दुपारची सफारी कोलारा गेटवरून केली असता माया वाघिणीचे तिच्या बछड्यासह तसेच  बिजली वाघिणीने दर्शन दिले. यावेळी काळा बिबटही दिसला