संस्कारदीप संवर्धक परिक्षा उत्तीणांना बक्षीस व प्रमाणपत्र वितरीत

0
11

लाखांदूर :- बहुजन प्रबोधन मंच, लाखांदूर कडून के.सी.ठाकरे प्रबोधकार लिखीत “लोकहितवादी दीनोध्दारक कर्मयोगी संत गाडगेबाबा” या पुस्तकावर आधारीत २० नोव्हे. २०२२ ला घेण्यात आलेल्या १२ व्या संस्कारदीप संवर्धक परीक्षेत उत्तीर्ण परीक्षार्थ्यांना सिध्दार्थ कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर येथे १९ फेब्रु. २०२३ छ. शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती दिनी आयोजित कार्यक्रमात परीक्षेचे संचालक अनिल काणेकर यांचे कडून पारीतोषिक व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. अनिल काणेकर यांनी सर्व उत्तीर्ण परीक्षार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी परीक्षा घेण्यामागचा उद्देश विषद करुन गाडेबाबा हे समाजातील अंधश्रध्दा घालविण्याची तर्कशक्तीचा कसा वापर करीत होते हे उदाहरण देऊन समजावून सांगितले. या प्रसंगी बोलतांना मान. संजय प्रधान सर यांनी सध्याच्या भरकटणाऱ्या पिढीला संस्कारीत करण्यासाठी त्यांनी क्रमिक अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरीक्तही ईतर पुस्तके वाचणे तसेच अशा परीक्षेला बसने गरजेचे असल्याचे सांगीतले. मान. एम. टी. घरडे सर यांनी अंधश्रध्दाळू लोक नवस फेडण्यासाठी प्राण्यांची करीत असलेली हिंसा रोकण्यासाठी गाडगेबाबा सतत झटल्याचे सांगीतले. मान. उध्दव रंगारी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांनी कोणत्याही गोष्टीला जसेच्या तसे न स्विकारण्यापूर्वी त्याच्या अन्वायार्थ लावायला शिकले पाहीजे, असे सांगीतले.
यावेळी परीक्षेत उत्तीर्ण परीक्षार्थी योगेश लोखंडे, किरण पिलारे, राजश्री नाकतोडे, निशा वाघमारे, नितू सरोते, प्रगती बुराडे, जयश्री गणवीर, श्रेया निंबेकर, युगांत मिसार, भोजराज कडीखाये, रत्नपाल शहारे, डेविड राऊत, तन्मय राऊत, खुशी वांढरे, सानिया यांनी गाडगेबाबा व शिवाजी महाराज यांच्या बद्दलची माहिती दिली.
यावेळी भंडारा, नागपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्हयातील १६ केंद्रातून बसलेल्या प्रौढ गटातील ६६ परीक्षार्थ्यांमधून उत्तीर्ण झालेल्या राणी चित्रलेखादेवी राजे भोसले माध्य. विद्यालय, कन्हाळगांव ता. हिंगणा या केंद्रातील अर्चना रविंद्र कांबळे प्रथम (८४%), डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमी, नागपूर या केंद्रातील चारुलता काशिराम बऱ्हाणपूरे, नागपूर व्दितीय (८०%) व हिंदी प्राथमिक व माध्यमिक मनपा शाळा कपिल नगर नागपूर, या केंद्रातील मयुर अशोक पाटील तृतीय (७८%) आलेत. तसेच युवा गटातून बसलेल्या २२० परीक्षार्थ्यांमधून उत्तीर्ण झालेल्या सिध्दार्थ कनिष्ठ महाविद्यालय, लाखांदूर या केंद्रातील युगांत विकास मिसार लाखांदूर प्रथम (७६%), रमाई बुध्द विहार श्रीनगर- नरेंद्र नगर, नागपूर या केंद्रातील प्रणय बाळकृष्ण कोचे खोलमारा व्दितीय (७२%) व ओम सत्यसाई महाविद्यालय जवाहर नगर भंडारा या केंद्रातील छाया सन्ताराम बघेल पेट्रोल पंम्प ठाणा तृतीय (७२%) आल्याबद्दल त्यांना पुस्तके, रोख रक्कम, व प्रमाणपत्र तसेच प्रत्येक केंद्रातून प्रथम, व्दितीय व तृतीया आलेल्यांना पुस्तके व प्रमाणपत्र तसेच पास झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यात आलीत.
कार्यक्रमाचे संचालन बहुजन विद्यार्थी संघाचे संघटक अजीत वैद्य सर तर आभार प्रदर्शन बहुजन विद्यार्थी संघाचे अध्यक्ष होमकांत उपरिकर यांनी केले