“शिवरायांची शौर्य गाथा ही सदैव प्रेरणादायीच”- प्रा. डॉ. नरेश इंगळे

0
11
पिंपळखुटा/प्रतिनिधी-  छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजेशाही/सरंजामशाही राजवटीच्या काळात रयतेचे/लोककल्याणकारी राज्य कसे असावे हे सर्व जगाला दाखवून दिले त्याचे हे कर्तृत्व आणि शौर्यगाथा ही सदैव मार्गदर्शक आणि प्रेरणादायीच राहील असे मत प्रा. डॉ. नरेश इंगळे यांनी व्यक्त केले.
 श्री. संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५३ व्या जयंती निमित्त आयोजित शिवजयंती कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना व्यक्त केले.सर्वप्रथम श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्टचे विश्वस्त संजय देशमुख यांचे हस्ते वस्तीगृह परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्तीचे पूजन व हार अर्पण करण्यात आले. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य बॅनर मुलींचे वस्तीगृहावरून पुष्प वर्षावात सोडण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे ढोल ताशाच्या पथकाद्वारा छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये बाल शिवाजी म्हणून यज्ञेश आपतूरकर व जिजाऊंचे भूमिकेत उर्वशी बेदरकर सहभागी झाले होते. यावेळी सर्व स्वयंसेवकाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य बॅनर सोडण्यात आले. त्यानंतर मार्गदर्शनाचा मुख्य कार्यक्रम कृषी महाविद्यालयाचे सेमिनार हॉलमध्ये घेण्यात आला.  अध्यक्षस्थानी श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालयांचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. नरेश इंगळे तर प्रमुख  पाहुणे म्हणून कृषी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.दीपक बोंद्रे, श्री. पद्माकर नागपुरे, कु. डॉ. इंगोले, श्री. सुहास अप्तूरकर, माधुरी काकडे, व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टधातू मूर्तीचे व फोटोचे पूजन व हार अर्पण कार्यक्रम तसेच दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर भूमेश्वरी ब्राह्मणकर, महादेव कायंदे ,श्रीकिश कोचे, कुणाल सेलोकार, यांनी आपले भाषणांमधून शिवचरित्र विशद केले.त्यानंतर उदय सरनाईक अमोल मांदडे, सारंग खासबागे, यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. यावेळी दीपक बोंद्रे यांनी आपले भाषणात प्रत्येक स्वयंसेवकांनी शिवाजी महाराज व इतर थोर पुरुषांचे विचार आपल्या अनुकरणात आणण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी शिवरायांचे कर्तुत्वावर एक  गझल सादर केली.अध्यक्षीय भाषणात डॉ. नरेश इंगळे यांनी शिवाजी महाराज यांचा परिपूर्ण इतिहास नवीन पिढीला सांगण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले व थोर पुरुषांच्या विचारांचे आचरण आपल्या कृतीमध्ये आणून सुदृढ समाजाचे निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचा शेवट महाराष्ट्र गीताने झाला. सूत्रसंचालन  उर्वशी बेदरकर हिने तर आभार प्रदर्शन प्रा दीपक बोंद्रे यांनी केले.