केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पंजाब येथील आयआयटी रोपर येथून देशव्यापी युवा उत्सवाची केली सुरुवात

0
6

राज्यातही मुंबई आणि जळगाव येथे शानदार युवा उत्सवाचे आयोजन

नेहरू युवा केंद्र आणि केंद्रीय संचार संचार ब्यूरोअंतर्गत मुंबईच्या नेहरू युवा केंद्राद्वारे आयोजित जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे मुंबई येथे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन

नेहरू युवा केंद्र जळगाव व जिल्हा प्रशासन जळगावद्वारा जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन

 

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आपल्या नेहरू युवा केंद्र संघटना या प्रमुख संघटनेच्या माध्यमातून देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये “युवा उत्सव- इंडिया@2047” कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत. या कार्यक्रमाचा भाग म्हणून, नेहरू युवा केंद्राच्या, जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आज (5 मार्च 2023) उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी यांच्या हस्ते बोरिवलीतल्या गोपाळकृष्ण गोखले हायस्कूल आणि जूनियर कॉलेज इथे उद्घाटन झाले. यावेळी स्थानिक आमदार सुनील राणे देखील उपस्थित होते. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचे औचित्य साधत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोच्या अखत्यारीतील नेहरू युवा केंद्र मुंबईने, बोरिवली सांस्कृतिक संस्थेच्या पार्थ इंडिया स्पोर्ट्स फाउंडेशन सोबत संयुक्तपणे, या युवा जिल्हा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळात, भारताच्या गौरवास्पद संस्कृती, परंपरा आणि आजवरच्या कामगिरीचा इतिहास साजरा करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या युवा उत्सवाअंतर्गत, सहा युवा केंद्री कार्यक्रम एकत्रित आयोजित केले जाणार आहेत.

अमृतकाळातील पंचप्रण- 1. विकसित भारताचे ध्येय,2. गुलामी आणि वसाहतवादाच्या अगदी बारीक सारीक खुणा देखील पुसून टाकणे, 3. आपल्या वारशाचा अभिमान बाळगणे,4. एकता आणि एकात्मता, आणि 5. नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना जागृत करणे. यावर या युवा उत्सवाची संकल्पना आधारित आहे. या कार्यक्रमाअंतर्गत, समूहनृत्यस्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. त्याशिवाय, युवकांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या इतर अनेक स्पर्धाही आयोजित केल्या जाणार आहेत. तसेच केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती देणारे प्रदर्शनही लावण्यात आले आहे.

नेहरू युवा केंद्र जळगाव व जिल्हा प्रशासन जळगावद्वारा जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज नाट्य संकुल जळगाव येथे शनिवार, ४ मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते.

पहिल्या सत्रात दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उदघाटन जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जळगावचे आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, कर्नल पवन कुमार, सामाजिक न्याय विभागाचे सह आयुक्त योगेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, लीड बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, केसीई आयएमआरच्या संचालिका शिल्पा बेंडाळे व इतर अधिकारी मान्यवर उपस्थित होते. नेहरु युवा केंद्राचे राज्य संचालक प्रकाश मनूरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी रूपरेषा स्पष्ट केली. युवकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी परिसरात विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी शनिवार, ४ मार्च रोजी पंजाबमधील आयआयटी रोपर येथून देशव्यापी युवा उत्सव-इंडिया@2047 चा प्रारंभ केला. त्या अनुषंगाने देशभर युवा उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.