गंगाझरी पोलिसांनी पकडले डिझेल पंप चोरास

0
56

गोंदिया,दि.05ः- जिल्ह्यातील गंगाझरी पोलीस ठाणे अंतर्गत दिनांक 27 ते 28/02/2023 च्या दरम्यान ओझीटोला येथील शेतशिवरातील नाल्यामध्ये शेतीला पाणी देण्याकरिता लावलेला किर्लोस्कर कंपनीचा 5 HP क्षमतेचा डिझेल पंप कि अंदाजे 20000 रू कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी 60/23 कलम 379 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंद करुन तपास कार्याला सुरवात केली.तपासादरम्यान गोपनीय मिळालेल्या बातमीच्या आधारे अजय साहेबराव पटले वय 23,केऊटोली,ता.जि.गोंदिया व आकाश सूकलाल कुंभरे,वय 21,रा ओझाटोला ता.जि गोंदिया यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांंनी पंप चोरी केल्याचे कबूल केल्याने मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक  निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. पोपट टिळेकर, पोलिस हवालदार मनोहर अंबुले,पोलिस हवालदार सुभाष हिवरे,चालक पोलिस शिपाई जितेंद्र बघेल यांनी कामगिरी केलेली आहे.