अपात्र ठरवून मला घाबरवू शकत नाहीत:मोदी-अदानींचे नाते काय? मी प्रश्न विचारतच राहणार : राहुल गांधी

0
22

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)- सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते. या मानहानीच्या प्रकरणात सुरतच्या कोर्टाने गुरुवारी दुपारी 12.30 वाजता राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. तर त्याच्या 27 मिनिटानंतर लगेचच जामीन देखील दिला. मात्र, शिक्षा जाहीर झाल्यानंतर 26 तासांनंतर शुक्रवारी त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. 23 तासांनंतर म्हणजेच शनिवारी राहुल प्रियंका गांधींसोबत काँग्रेस कार्यालयात पोहोचले आणि प्रसारमाध्यमांशी बोलले.

भारताची लोकशाही धोक्यात आली आहे… या ओळीने राहुल गांधी यांनी बोलण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी विचारले की, ‘अदानी आणि मोदी यांचे नाते काय? त्यांनी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात लोकशाहीवर केलेले भाष्य आणि सर्व चोरांना मोदी हे आडनाव का? या विधानावर देखील स्पष्टीकरण दिले. तसेच भविष्यातील योजनाही सांगितल्या.

1. प्रश्न: तुम्ही शहीदांच्या कुटुंबातून आला आहात. तुमची आजी देखील अपात्र ठरल्या. त्या नंतर जनतेत गेल्या. सत्तेवर परत आल्या. आजच्या युगात तर राहुलही अपात्र झाले आहेत. तुम्ही सगळे मुद्दे मांडलेत. चीनचा मुद्दा उपस्थित केला. राहुल गांधीही जनतेत जाणार का? आणि पुन्हा तेच रिटर्न घडेल का…?

राहुल : भारत जोडो यात्रेत राहुल गांधी साडेचार महिने जनतेत राहिले. हे माझे काम आहे आणि करत राहीन. आजच्या भारतात पूर्वीच्या राजकीय पक्षांना पाठिंबा मिळत असे, मीडिया आणि इतर संस्थांची साथ भेटायची, ती आता भेटत नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडे एकच पर्याय आहे. लोकांमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही.

2. प्रश्न: भारतीय जनता पक्षाने तुमच्यावर ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. यावर तुमचे उत्तर काय असेल?

राहुल : माझ्या भारत जोडो यात्रेतील माझे कोणतेही भाषण तुम्ही पाहू शकता. मी तिथे म्हणतोय की सर्व समाज एक आहे. सर्वांनी एकत्र यावे. बंधुभाव असावा. द्वेष नसावा, हिंसा नसावी. हा ओबीसीचा प्रश्न नाही, नरेंद्र मोदीजी आणि अदानीजींच्या नात्याचा प्रश्न आहे. 20 हजार कोटी रुपये, अदानी यांना कुठून मिळाले हे माहीत नाही. त्याबद्दल मी प्रश्न विचारत आहे. त्याला उत्तर हवे आहे. भाजप लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहे. कधी ते ओबीसींबद्दल बोलतात, कधी परदेशाबद्दल बोलतात…

3. प्रश्न: तुम्ही घाबरत नाही असे सांगितले. मात्र तुम्ही राज्याच्या निशाण्यावर आहात. संपूर्ण यंत्रणा तुमच्या विरोधात आहे. मग तुमच्यासाठी पुढचा मार्ग काय आहे?

राहुल : राज्य कोणतेही असो. मी सत्य पाहतो मला इतर कशातही रस नाही. मी खरे बोलतो राजकारणात ही काही फॅशनेबल गोष्ट नाही. पण ही गोष्ट माझ्या रक्तातच आहे. मला दुसरा कोणताही मार्ग सापडत नाही. तर हे माझे काम आहे. ही माझी तपश्चर्या आहे. जीवन म्हणजे तपश्चर्या. मी तपश्चर्या करत राहीन. मग तुम्ही अपात्र ठरवा, मारहाण करा, तुरुंगात टाकले तरी. माझी हरकत नाही. या देशाने मला सर्व काही दिले आहे.

4. प्रश्नः तुमच्यावर हल्ला करणारे भाजप नेते. त्यावर तुम्ही काय सांगाल? शिवाय, वायनाडच्या लोकांचा विश्वास बसत नाही. त्यावर तुम्ही काय म्हणाल?

राहुल : वायनाडच्या लोकांशी माझे कौटुंबिक नाते आहे. कुटुंब आणि प्रेम यांचे नाते आहे. मला वाटले वायनाडच्या लोकांना पत्र लिहून त्यांच्यासाठी माझ्या मनात काय आहे ते व्यक्त करावे.

राहुल गांधींसोबत प्रियंका गांधी देखील पक्षाच्या कार्यालयात पाहोचल्या.

राहुल गांधींसोबत प्रियंका गांधीही पक्ष कार्यालयात

संसद सदस्यत्व रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पक्ष कार्यालयात त्यांच्यासोबत प्रियंका गांधी यांच्यासोबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलही उपस्थित होते.

युवक काँग्रेसतर्फेही आज देशभरात वेगवेगळी निदर्शने करण्यात येणार आहेत. याशिवाय काँग्रेसने सोमवारपासून देशभरात संविधान वाचवा आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. मल्लिकार्जुन खरगे यांची रणनीतीसाठी आज महत्त्वाची बैठकही होणार आहे. यामध्ये सोनिया गांधी आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहु शकतात.

हा फोटो 24 सप्टेंबर 2013 चा आहे, जेव्हा राहुल गांधींनी मनमोहन सिंग सरकारचा अध्यादेश फाडला होता.
हा फोटो 24 सप्टेंबर 2013 चा आहे, जेव्हा राहुल गांधींनी मनमोहन सिंग सरकारचा अध्यादेश फाडला होता.

2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की जर खासदार/आमदाराला 2 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्याचे सदस्यत्व तात्काळ संपुष्टात येईल. मनमोहन सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अध्यादेश आणला होता, जेणेकरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कुचकामी ठरेल.24 सप्टेंबर 2013 रोजी काँग्रेस सरकारने अध्यादेशावर बोलण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. याच पत्रकार परिषदेत राहुल गांधी पोहोचले आणि म्हणाले की, ‘हा अध्यादेश कचरा आहे आणि तो फाडून फेकला गेला पाहिजे.’ त्यांनी अध्यादेशाची प्रत फाडली. त्यानंतर हा अध्यादेश मागे घेण्यात आला.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, 'राहुल गांधींनी अदानी-मोदी संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याचे उत्तर सरकारला द्यायचे नाही. राहुल यांच्यावरील कारवाई या प्रश्नाचे फलित आहे.'
प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘राहुल गांधींनी अदानी-मोदी संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याचे उत्तर सरकारला द्यायचे नाही. राहुल यांच्यावरील कारवाई या प्रश्नाचे फलित आहे.’

लोकसभेच्या वेबसाइटवरून राहुलचे नाव हटवले

राहुल यांचे संसद सदस्यत्व शुक्रवारी रद्द करण्यात आले. लोकसभा सचिवालयाने एक पत्र जारी करून याबाबत माहिती दिली होती, तसेच लोकसभेच्या वेबसाइटवरून राहुल यांचे नाव हटवले होते. राहुल केरळमधील वायनाडमधून खासदार होते. 2019 मध्ये राहुल यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोदी आडनावाबाबत वक्तव्य केले होते.

ते म्हणाले होते की, ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे?’ या मानहानीच्या प्रकरणात सुरतच्या कोर्टाने गुरुवारी दुपारी 12.30 वाजता राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्याला 27 मिनिटांनी जामीन मिळाला. मात्र, शिक्षा घोषित झाल्यानंतर अवघ्या 26 तासांतच त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.

सुप्रीम कोर्टाने 11 जुलै 2013 रोजी दिलेल्या निकालात म्हटले होते की, खालच्या कोर्टात दोषी ठरल्यापासून कोणताही खासदार किंवा आमदार संसद किंवा विधानसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरेल.

खासदारकी रद्द केल्याच्या निर्णयानंतर राहुल गांधींनी 3 तासांनी ट्विट केले.
खासदारकी रद्द केल्याच्या निर्णयानंतर राहुल गांधींनी 3 तासांनी ट्विट केले.

लोकसभा सचिवालयाने हे पत्र जारी केले आहे…

  • कायदेतज्ज्ञांच्या मते, लोकसभा सचिवालयाने वायनाड ही राहुल गांधी यांची संसदीय जागा रिक्त असल्याचे घोषित केले आहे. निवडणूक आयोग आता या जागेवरील निवडणुकीची घोषणा करू शकते. राहुल गांधींना दिल्लीतील सरकारी बंगला रिकामा करण्यासही सांगितले जाऊ शकते.
  • उच्च न्यायालयानेही राहुल गांधी यांची शिक्षा कायम ठेवली तर ते पुढील 8 वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत. 2 वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर ते सहा वर्षांसाठी अपात्र ठरतील.
  • सुरत न्यायालयाच्या निर्णयाला राहुल गांधी आता उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात. निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून केवळ राष्ट्रपती खासदाराला अपात्र ठरवू शकतात या कारवाईच्या कायदेशीरतेवरही काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

काँग्रेसचे पुढचे पाऊल काय?
सुरत न्यायालयाच्या निर्णयाला राहुल गांधी यांची टीम आता उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. सुरत न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील तेथे स्वीकारले नाही, तर थेट सर्वोच्च न्यायालयात अपील केले जाईल. सुरत न्यायालयाच्या निकालाविरुद्ध अपील दाखल करण्यासाठी राहुल गांधी यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती.

हा सुरत विमानतळावरील दृष्य आहे. शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी दिल्लीला परतले होते.
हा सुरत विमानतळावरील दृष्य आहे. शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी दिल्लीला परतले होते.

राहुल गांधी यांच्यावर आणखी 4 मानहानीचे खटले सुरू आहेत, ज्यावर निर्णय येणे बाकी आहे…

1. 2014 मध्ये राहुल गांधींनी महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप संघावर केला होता. संघाच्या एका कार्यकर्त्याने राहुलविरुद्ध आयपीसीच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. महाराष्ट्रातील भिवंडी न्यायालयात हा खटला सुरू आहे.

2. 2016 मध्ये, कलम 499 आणि 500 अंतर्गत राहुल गांधी यांच्याविरुद्ध गुवाहाटी, आसाम येथे मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. फिर्यादीनुसार, राहुल गांधी म्हणाले होते की, संघाच्या सदस्यांनी मला आसाममधील 16व्या शतकातील वैष्णव मठ बारपेटा सत्रामध्ये प्रवेश दिला नाही. यामुळे संघाची प्रतिमा खराब झाली आहे. हे प्रकरणही न्यायालयात प्रलंबित आहे.

3. 2018 मध्ये झारखंडची राजधानी रांचीमध्ये राहुल गांधींविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. रांचीच्या उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. आयपीसीच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत राहुल यांच्यावर 20 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राहुल यांच्या विधानावर आक्षेप नोंदवण्यात आला असून त्यात त्यांनी ‘मोदी चोर आहे’ असे म्हटले आहे.

4. 2018 मध्येच महाराष्ट्रात राहुल गांधींवर आणखी एक मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. माझगाव येथील शिवडी न्यायालयात हा खटला सुरू आहे. आयपीसीच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संघाच्या कार्यकर्त्याने गुन्हा दाखल केला होता. गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध भाजप आणि संघाच्या विचारसरणीशी जोडल्याचा आरोप राहुल यांच्यावर आहे.

राहुल गांधी आज सकाळी लोकसभेतही गेले होते, जिथे त्यांनी अदानी प्रकरणावर भाष्य केले.

आता जाणून घ्या, राहुल गांधी यांनी लोकसभा सदस्यत्व का गमावले?

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे एका सभेत राहुल गांधी म्हणाले होते, ‘चोरों का सरनेम मोदी है। सभी चोरों का सरनेम मोदी क्यों होता है, चाहे वह ललित मोदी हो या नीरव मोदी हो चाहे नरेंद्र मोदी।’

यानंतर सुरत पश्चिमचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. राहुल गांधींनी आमच्या संपूर्ण समाजाला चोर म्हटले असून ही आमच्या समाजाची बदनामी आहे, असे ते म्हणाले. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी तीन वेळा न्यायालयात हजर झाले. ऑक्टोबर 2021 च्या शेवटच्या हजेरीदरम्यान, त्यांनी स्वतःला निर्दोष घोषित केले.

त्यांच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, ‘राहुल यांनी वक्तव्य देताना माझा हेतू चुकीचा नव्हता असे सांगितले. मी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता.

याप्रकरणी राहुल गांधी यांना गुरुवारी सुरत कोर्टाने दोषी ठरवले. न्यायालयाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 15 हजारांचा दंडही ठोठावला आहे. काही वेळानंतर त्याच न्यायालयाने त्यांना 30 दिवसांचा जामीनही मंजूर केला. मानहानीच्या प्रकरणात 2 वर्षे तुरुंगवास ही कमाल शिक्षा आहे. म्हणजेच याप्रकरणी यापेक्षा जास्त शिक्षा देता येणार नाही.

राहुल गांधींचे वकील बाबू मांगुकिया यांनी सांगितले की, मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या कोर्टाने राहुल गांधींना भारतीय दंड विधानाच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत दोषी ठरवले आहे. तसेच त्यांना जामीन मंजूर केला आणि उच्च न्यायालयात अपील करण्याची संधी देण्यासाठी 30 दिवसांसाठी शिक्षा स्थगित केली.