गोरेगाव येथे खा.पटेल यांच्या निधीतून विकास कामाचे भूमिपूजन

0
16

 गोरेगाव,दि.25ः– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून गोरेगाव शहर येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर प्रामुख्याने उपस्थित होते.शहरातील वॉर्ड क्र.३ मध्ये श्री नितेश येले यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता बांधकाम, वॉर्ड क्र.१ मध्ये संजय येडे यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता बांधकाम व वॉर्ड क्र. ७ मध्ये योगेश चौधरी यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यापुर्वी गोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विशेष बैठक जनसंपर्क कार्यालय, गोरेगांव येथे पार पडली.बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकी संदर्भात योग्य नियोजन व निवडणूक पूर्व तयारी करण्याच्या सूचना प्रमूख मान्यवरांनी केल्या.यावेळी सर्वश्री राजेन्द्र जैन, गंगाधर परशुरामकर, केवल बघेले, विशाल शेंडे, कृष्णकुमार बिसेन, श्रीप्रकाश रहांगडाले, डॉ गणेश बघेले, रुस्तम येडे, सुरेंद्र रहांगडाले, सोमेश रहांगडाले, रामभाऊ हरिणखेडे, कमलेश बारेवार, परशुराम वंजारी, श्रद्धाताई रहांगडाले, उषाताई रामटेके, रामेश्वरी रहांगडाले, अर्चना चौधरी, सरिता येळणे, कुंदा रुकमोडे, दसरथ बिसेन, छगनलाल गौतम, लालचंद चव्हाण, टी. के. कटरे, रामभाऊ आगडे, अनुराज सरोजकर, प्रतीक पारधी, गेंदलाल गौतम, यु.जी.बिसेन सर, भोजराज चौहान, लिलेंद्र पटले, शोमेश्वर बघेले, नितेश येले, टेकेश रहांगडाले, अनुप पटले, किशोर कुंभरे, डेव्हिड राऊत, तांनूभाऊ हरिनखेडे, शिवाजी ठाकरे, महेंद्र कटरे, नरेन्द्र उके, कमलानंद तुरकर, धनेश्वर तिरेले, देवेंद्र ठाकरे, भोजराज चौहान सहित असंख्ये कार्यकर्ता उपस्थित होते.