मत्स्यव्यवसाय उत्पादनावर पार पडली आमगावात कार्यशाळा

0
9

 गोंदिया,दि.26- आमगाव तालुक्यातील किंडगीपार येथील तुलसी आयटीआय येथे मत्स्य व्यवसाय उत्पादन व बाजारपेठ संदर्भात जागरूकता कार्यक्रम मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले.तसेच श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदिया द्वारा फार्मर प्रोडूसर कंपनी संस्था तयार करण्याकरीता नाबार्ड पुणेचे व्यवसथापक सचिन काबंळे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.अध्यक्षस्थानी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अविनाश लाड,श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे संस्थापक विजय बाहेकर,प्रगत शेतकरी ताणबा राजाराम देशमुख,मुख्याध्यापक सी.जे.पाऊलझगडे,प्रवीण चकोले,पंकज बागल, इंद्रकुमार बाहेकर ,डुगेश्वर गौतम,विनोद कागदी मेश्राम,गौरी देशमुख, शारदा कोटांगले,महापात्रे,माला पटले,रतिरामजी बर्वे प्रामुख्याने उपस्थित होते.प्रास्ताविकात फार्मर प्रोडूसर कंपनीची माहिती विजय बाहेकर यांनी  दिली.गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा असून सुद्धा उद्योगाच्या बाबतीत खूप मागासलेला आहे.विकासाला चालना मिळवून देण्यासाठी फार्मर प्रोडूसर कंपनीची स्थापना आम्ही केली जेणेकरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जोडधंदा मिळावा.मासोळी व्यवसायासोबतच पर्यटन व्यवस्था यांचा ताळमेळ साधून तलावाच्या जिल्ह्याचा विकास आम्ही करू शकतो असे प्रास्ताविकात सांगितले.सचिन कांबळे यांनी मत्स्य व्यवसाय आपण तलावातून जास्त प्रमाणात करू शकतो, फक्त सागरी भागातच नाही तर आपण गोड्या पाण्यातून आणि तलावाच्या माध्यमातून मत्स्य उत्पादन चांगल्या पद्धतीने करू शकतो.परंतु जोपर्यंत आपण या संघटनेचे सदस्य बनत नाही तोपर्यंत आपल्याला याचा लाभ मिळणार नाही.तांत्रिक पद्धती आणि ट्रेनिंग घेऊन कशा पद्धतीचे बियाणे टाकायचे व उत्पादन कसे घ्यायचे,कुठे विकायचे आणि योग्य बाजारपेठ कुठे लाभेल यावर मार्गदर्शन केले.अविनाश लाड यांनी आपल्याला फार्मर प्रोडूसर कंपनीद्वारे भरपूर मदत मिळत आहे.गोंदिया जिल्ह्यात चार ब्लॉग आपण निवडलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला प्रगती करायची आहे तर त्यासाठी मोबिलायझेशनची गरज असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाला प्रामुख्याने गौरी देशमुख,माला पटले,पल्लवी इंगळे,सुनंदा बोहरे,गंगा सतीशहारे, अरुणा बाहेकर,शारदा कोटांगले,सुरेंद्र महापात्रे रतिरामजी बर्वे ,शारदा शेंडे उपस्थित होते.यशस्वीतेसाठी रेखा बाणेवार,अश्विन पडंरू, व सर्वांनी अथक प्रयत्न घेतले.संचालन शालू कृपाले यांनी केले.तर आभार प्रदर्शन अरूणा बाहेकर यांनी मानले.