विरोधकांचा ब्लॅक प्रोटेस्ट:सोनिया गांधींही आल्या काळ्या कपड्यात;निदर्शनात TMC सह 17 पक्ष

0
28

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)- संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज आज सुरू होताच स्थगित करण्यात आले. अदानी आणि राहुल यांच्या अपात्र प्रकरणी विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि लोकसभेचे कामकाज 4 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे खासदार आज काळे कपडे घालून संसदेत पोहोचले होते.

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संसदेच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संसदेच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

खरगे यांच्या दालनात विरोधकांची बैठक


संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेतील त्यांच्या चेंबरमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. काँग्रेस, द्रमुक, सपा, जेडीयू, बीआरएस, सीपीएम, आरजेडी, एनसीपी, सीपीआय, आप आणि टीएमसीसह 17 पक्ष या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला तृणमूल काँग्रेसची उपस्थिती आश्चर्यकारक होती. याबाबत खर्गे म्हणाले की, लोकशाही रक्षणासाठी जो पुढे येईल त्याचे स्वागत करू.

खरगे म्हणाले- लोकशाहीचा काळा अध्याय
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट केले- लोकशाहीसाठी “काळा अध्याय”! सत्ताधारी पक्ष पहिल्यांदाच संसद ठप्प करत आहे. का? कारण मोदीजींच्या जिवलग मित्राची काळी कृत्य उघड होत आहेत. विरोधक जेपीसीच्या मागणीवर ठाम असल्याचे खरगे म्हणाले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरवल्यानंतर काँग्रेसचे खासदार काळे कपडे घालून संसदेत आले आहेत.
राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरवल्यानंतर काँग्रेसचे खासदार काळे कपडे घालून संसदेत आले आहेत.

अदानी मुद्द्यावर कॉंग्रेस आंदोलन करणार
अदानी मुद्द्यावरून काँग्रेस नेते पुन्हा एकदा केंद्राविरोधात आंदोलन करणार आहेत. याआधी ऑगस्ट 2022 मध्ये राहुल गांधींसह काँग्रेसच्या खासदारांनी महागाई, जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर काळे कपडे घालून निदर्शने केली होती. तसेच राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढला.

हे ही वाचा सविस्तर

कॉंग्रेसचा संकल्प सत्याग्रह : राहुल यांनी ट्विटर प्रोफाईलमध्ये लिहिले ‘अपात्र खासदार’

राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या विरोधात काँग्रेसतर्फे रविवारी देशभरात संकल्प सत्याग्रह आंदोलन केले जात आहे. सकाळी 10 वाजल्यापासून सर्व राज्यांतील जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर महात्मा गांधीं यांच्या पुतळ्यासमोर पक्षाचे बडे नेते आणि कार्यकर्ते निदर्शने केले