नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

0
13
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई – देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील नव्या 20 मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले आहे. 10 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यांचे वाटप करण्यात आले. त्यात शिवसेनेच्या 5 कॅबिनेट, 5 राज्यमंत्री आणि भाजपच्या 5 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. सविस्तर खातेवाटप खालीलप्रमाणे –

देवेंद्र फडणवीस – सामान्य प्रशासन विभाग, नगर विकास गृह, विधी व न्याय विभाग, बंदरे, पर्यटन, माहिती व जनसंपर्क, माजी सैनिकांचे कल्याण, राज्य शिष्टाचार, रोजगार व स्वयंरोजगार व इतर मंत्र्यांना विविक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग.
एकनाथ खडसे – महसूल, मदत कार्य व पूनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास आणि वक्‍फ, कृषी व फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्यव्यवसाय, राज्य उत्पादन शुल्क.
सुधीर मुनगंटीवार – वित्त आणि नियोजन, वने.
विनोद तावडे – शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य.
प्रकाश मेहता – गृहनिर्माण, खनिकर्म, कामगार.
चंद्रकांत पाटील – सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
पंकजा मुंडे – ग्रामविकास आणि जलसंधारण, रोजगार हमी योजना, महिला आणि बालविकास.
विष्णू सावरा – आदिवासी विकास.
गिरीश बापट – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य.
गिरीश महाजन – जलसंपदा.
दिवाकर रावते – परिवहन
सुभाष देसाई – उद्योग
रामदास कदम – पर्यावरण
एकनाथ शिंदे – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
चंद्रशेखर बावनकुळे – ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा
बबनराव लोणीकर – पाणीपुरवठा व स्वच्छता
डॉ. दीपक सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुब कल्याण
राजकुमार बडोले – सामाजिक न्याय व विशेष साहाय्य

राज्यमंत्री
दिलीप कांबळे – सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य.
विद्या ठाकूर – महिला व बाल विकास, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन.
राम शिंदे – गृह (ग्रामीण), पणन, सार्वजिक आरोग्य, पर्यटन
विजय देशमुख – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), परिवहन, कामगार, वस्त्रोद्योग
संजय राठोड – महसूल
दादाजी भुसे – सहकार
विजय शिवतारे – जलसंपदा, जलसंधारण
दीपक केसरकर – वित्त, ग्रामविकास
राजे अंबरिशराव आत्राम – आदिवासी विकास
रवींद्र वायकर – गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण
डॉ. रणजित पाटील – गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, विधी व न्याय, संसदीय कार्य
प्रवीण पोटे – उद्योग व खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)