संसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान

0
6

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, संसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज संबंधित फलकाचे प्रत्यक्ष अनावरण करून संसदेच्या  नव्या इमारतीचे लोकार्पण केले. या प्रसंगी पंतप्रधानांनी ट्विट संदेश जारी केला आहे, त्यात ते म्हणाले;

“आपल्या सर्व देशवासीयांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे. नवीन संसद भवनामुळे आपणा सर्वांची मने अभिमानाने आणि आकांक्षांनी भरून जाणार आहेत.ही भव्य-दिव्य इमारत सर्वसामान्य जनतेच्या सक्षमीकरणासह देशाची संपन्नता आणि सामर्थ्य यांना नवी गती आणि शक्ती देईल.”

“भारतीय संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन होत असताना, आपल्या सर्वांची हृदये आणि मने अभिमान, आशा आणि वचनांनी भरून गेली आहेत. ही प्रतिष्ठित इमारत सक्षमीकरण करणारी आणि नव्या स्वप्नांना पंख देणारी ठरेल आणि त्यांची जोपासना करून त्यांना प्रत्यक्षात उतरवेल. या इमारतीच्या माध्यमातून आपला महान देश प्रगतीची नवी उंची प्राप्त करो हीच सदिच्छा.”

***