अध्यक्षांनी दुष्काळवरील स्थगन प्रस्ताव फेटाळला

0
12

नागपूर-येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवसाच्या कामकाजाला सुरवात झाली असून विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी प्रश्नोतराच्या तासात दुष्काळावर चचार् करण्यात यावी या मुद्याला घेऊन गदारोळ सुरु केला.त्यातच विरोधी पक्षांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे दुष्काळावरील चचेर्साठी स्थगन प्रस्ताव ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली.ती मागणी अध्यक्षांनी फेटाळल्याने विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी घोषणाबाजी केली.सरकारने राज्य दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी धरुन लावली आहे.तर विधानपरिषदेतही विरोधी पक्षानी आक्रमक भुमिका माडंल्याने दोनदा परिषदेचे कामकाज तहकुब करावे लागले आहे.शेतकयासाठी पॅकेज जाहीर करण्यात यावा अशी मागणीही काँग्रेस व राषट्रवादीच्या आमदारानी धरुन लावली आहे.मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करुन बसली आहे.अध्यक्षासमोरील वेलमध्ये आमदारांनी ठिय्या आंदोलनाला सुरवात केली आहे.विरोधकांच्या आक्रमक गोंधळामूळे विधानसभेचेही कामकाज तहकुब करावे लागले आहे.