शिष्यवृत्तीसाठी ओबीसींनी केली शाळा,महाविद्यालये बंद

0
11
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गडचिरोली-ओबीसींची प्रलंबित शिष्यवृत्ती, कपात केलेले आरक्षण, ओबीसींची स्वतंत्र जनगणना, राज्यपालांची अधिसूचना रद्द करणे, नॉनक्रिमीलेयरची मर्यादा ६ करणे अशा विविध मागण्यांसाठी(ता़८) ओबीसींच्या विविध संघटनांच्या वतीने गडचिरोलीसह अन्य तालुक्यातील शाळा, महाविद्यालये बंद आंदोलन करण्यात आले़

सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण ६ टक्क्यांवर आणले आहे़ शिवाय अनुसूचित क्षेत्रात वर्ग ३ व ४ ची नोकर•ारती करताना पूर्णपणे आदिवासी उमेदवारांनाच प्राधान्य दिले आहे़ तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नॉन क्रिमीलेयरची उत्पन्न मर्यादा साडेचार लाखांवरून ६ लाख करावी तसेच ओबीसींची थकीत असलेली ११०० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यासंदर्•ाात लक्षवेधी उपस्थित केली होती़ परंतु पुढे काहीच झाले नाही़ त्याअनुषंगाने ओबीसी नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला असून, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याचा घाट राज्य शासनाने घातल्याचा आरोप केला जात आहे. याच्या निषेधार्थ ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी कर्मचारी असोसिएशन, मराठा सेवा संघ, सं•ााजी ब्रिगेड इत्यादी संघटनांच्या वतीने आज गडचिरोली जिल्ह्यात शाळा बंद आंदोलन करण्यात आले़

आज सकाळी ओबीसी कर्मचारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा़शेषराव येलेकर, ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अरुण मुनघाटे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चापले यांच्यासह प्रशांत वाघरे, प्र•ााकरराव वासेकर, दादा चुधरी, गणेश वसू, प्रवीण म्हशाखेत्री, रत्नदीप म्हशाखेत्री, •ाास्कर बुरे, संतोष बोलुवार आदींनी गडचिरोली येथील शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन ती बंद करायला लावली़ आज सकाळी खासगी शाळा, महाविद्यालये सुरू होती़ परंतु आंदोलनकर्त्यांनी धडक दिल्यानंतर सकाळच्या शाळेला सुटी देण्यात आली़ त्यानंतर दुपारच्या सत्रातील शाळा बंद ठेवण्यात आल्या़