विरोधी पक्ष नेत्यासाठी आबा चे नाव-अजित पवार

0
15

नागपूर-विधानसभेतील विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देत सरकारमध्ये सहभागी झाल्याने विरोधी पक्ष नेत्याच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे दावा सादर केला आहे.राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आर.आर.पाटील यांचे नाव विरोधी पक्ष नेत्यासाठी सादर करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अजित पवार यांनी पत्रकाराना दिली.राष्ट्रवादीकडे राष्ट्रवादीचे 41,बहुजन विकास आघाडीचे 3 आणि आमदार रवी राणा असे 45 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र दिल्याचेही सांगितले.काँग्रेसकडे 42 आमदार असताना त्यांचे 5 आमदार निलबिंत असल्याने काँग्रेसला विरोधी पक्षापासून मुकावे लागणार आहे.