37.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News भीषण अपघात,जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली

भीषण अपघात,जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली

0
31

blank

गुजरातमध्ये जवानांना घेऊन जात असलेल्या बसचा भीषण अपघात झाला. पंचमहल जिल्ह्यात झालेल्या या अपघातात राज्य राखीव पोलीस दलाचे ३८ जवान जखमी झाले आहेत. पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा याबाबत माहिती दिली.या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

पोलिसांनी सांगितले की, एसआरपी जवानांना घेऊन जात असलेली बस पंचमहल जिल्ह्यात उलटली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. सर्व ३८ जवान जखमी झाले आहेत. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पोलिस निरीक्षक आर ए जडेजा यांनी सांगितलं की, दुर्घटनेवेळी बसमध्ये ५० जवान होते. त्यापैकी ३८ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नेण्यात आलं आहे. २९ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर ९ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एसआरपीचे जवान फायरिंगचा सराव करून परत येत असताना ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे.पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, जवान पावागढ इथल्या पर्वतीय भागात तीन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात भाग घेण्यासाठी गेले होते. तिथून परत येताना गाडीचे ब्रेक फेल झाले. या गाडीत ५० जवान होते. बसवरचं नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली.

blank