अर्धवट आरक्षण नको,जरांगे पाटील यांचा मागे हटण्यास नकार;मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न पुन्हा फेल

0
2

मनोज जरांगे आजपासून पाणी पिणार,आंदोलक हिंसक होत असल्याने घेतला निर्णय

मुंबई:-मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी फोनवरून संवाद साधला. या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली. आपण आपले आंदोलन थांबवणार नाही, मराठा समाजाला अर्धवट आरक्षण दिले जात असून आम्ही ते स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. आपण पाणी प्यायला सुरुवात केल्यापासून राज्यभरात सुरू असलेले जाळपोळीचे प्रकार थांबले असल्याचे ते म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी गेल्या सात दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत आहे. मराठा आंदोलकांच्या आग्रहामुळे जरांगे आजपासून पाणी पिणार आहे.मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्यात. उग्र आंदोलन होत असल्याने आंदोलकांच्या आग्रहाने ते पाणी घेणार आहे. पाणी घेत नसल्याने तब्येत खालावत असल्याने आंदोलक हिंसक होत असल्याने मनोज जरांगे-पाटील यांनी निर्णय घेतला आहे.

️️लोकप्रतिनिधींकडे होत असलेली राजीनाम्याची मागणी, जमावाने लोकप्रतिनिधींच्या मालमत्तेची केलेली नासधूस याबद्दल प्रश्न विचारला असता जरांगे पाटील यांनी म्हटले की, लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिल्याने काय फायदा-नुकसान होणार आहे हे मला माहिती नाही, मात्र लोकप्रतिनिधी, मंत्र्यांनी दबावगट तयार करून आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सगळ्यांनीच राजीनामे दिले तर सभागृहात आवाज कोण उठवणार? म्हणून आमदार खासदारांनी मुंबई गाठावी आणि तिथेच थांबून आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावे असे ते म्हणाले.