
गोंदिया,दि.05- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या मध्यप्रदेश राज्यातील सिवनी बालाघाट येथे निवडणुक प्रचार दौरा आहे.तेथे जाण्यासाठी ते गोंदिया येथील बिरसी विमानतळावर आज सकाळी 11 वाजेच्या सुुमारास त्यांचे विमान उतरणार असून तिथूनच ते हेलिकाॅप्टरने सिवनी येथील जाहिर सभेला संबोधित करण्याकरीता रवाना होणार आहेत.तिथून सभा आटोपून परत बिरसीविमानतळावर येऊन इंदोरला रवाना होणार आहेत.पंंतप्रधान मोदी यांंच्या दौऱ्याला घेऊन जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून गेल्या दोन दिवसापासून बिरसीविमानतळ परिसरातील मार्गावर चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.तसेच पाच किलोमीटर परिसरात ड्रोन उडविण्यासही मनाई करण्यात आली आहे.