गोंदिया,दि.04- तालुक्यातंर्गत येत असलेल्या आंभोरा येथील विशाल लालचंद रामटेके वय २८ या युवकाचा गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या कलपाथरी जलाशय परिसरात मृतदेह आढळून (दि.04)आला आहे.हा खून आहे की आत्महत्या हे अद्यापही कळले नसून गोरेगाव पोलीस घटनास्थळी पोचून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविले आहे.