तिरोडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
7

तिरोडा,दि.01ः-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)गटाची सभा तिरोडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात 30 नोव्हेंबरला पार पडली.या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आमदार रोहीत पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या युवा संघर्ष यात्रेची समारोप सभा येत्या १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे संपन्न होणार आहे.या समारोप सभा व युवा संघर्ष यात्रेची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते सलील देशमुख गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमूख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक तिरोडा येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडली.

सलील देशमुख यांच्यासह रविकांत बोपचे यांनी उपस्थित पदाधिकारी व सहकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना संघर्ष यात्रेची माहिती दिली. ही सभा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि अधिकाधिक जनतेपर्यंत या संघर्ष यात्रेची माहिती पोहोचवावी, असे आवाहन केले.