स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपट आता अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!

0
11

आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही. ऋतुराज धलगाडे दिग्दर्शित ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपटाने आयुष्यात एकटेपणा जाणवणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण शोधण्यासाठी प्रेरित करण्याचा सुंदर संदेश दिला आहे. ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपट १ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याचे दु:ख लोक उराशी बाळगून असतात, कुटुंबापासून दूर राहणाऱ्या लोकांना एकटेपणा जाणवतो. अशा लोकांच्या आयुष्यातील संवादाचा दुरावा भरून काढण्यासाठी मानस, नैना, मारुती आणि श्रीरंग काका हे चार लोक ‘ॲंटी लोनलीनेस प्रोग्राम’ सुरू करतात, लोकांच्या जीवनातील एकटेपणाची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करतात. पण प्रोग्राम यशस्वी ठरेल की नाही हे चित्रपटात पहायला मिळणार आहे.

“एकटेपणा हा केवळ शब्द नसून ती एक भावना आहे, जी ठराविक काळाने कोणालाही जाणवू शकते. परंतु त्याचा परिणाम न होता आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे ही गरज आहे. हा विलक्षण संदेश देणारा चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.