भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर,गडकरी,तडस,मुनगंटीवार

0
15

नवी दिल्ली-— भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील वीस नेत्यांचा या यादीमध्ये समावेश आहे. पंकजा मुंडे, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, हिना गावित, पियुष गोयल,मुरलीधर मोहोळ या नेत्यांचा यादीमध्ये समावेश आहे.(BJP releases its second list of candidates for the upcoming Lok Sabha elections)
नंदुरबारमधून डॉ. हिना गावित, धुळ्यातून सुभाष भामरे, जळगावमधून श्रीमती स्मिता वाघ, रावेतमधून रक्षा खडसे, अकोल्यातून अनूप धोत्रे, वर्ध्यातून रामदास तडस, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, नांदेडमधून प्रतापराव चिखलिकर, जालन्यातून रावसाहेब दानवे यांच्या नावाचा समावेश आहे.
नंदुरबारमधून डॉ. हिना गावित, धुळ्यातून सुभाष भामरे, जळगावमधून श्रीमती स्मिता वाघ, रावेतमधून रक्षा खडसे, अकोल्यातून अनूप धोत्रे, वर्ध्यातून रामदास तडस, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, नांदेडमधून प्रतापराव चिखलिकर, जालन्यातून रावसाहेब दानवे यांच्या नावाचा समावेश आहे.

डिंडोरीतून भारती पवार, भिवंडीतून कपिल मोरेश्वर पाटील, मुंबई उत्तरमधून पियूष गोयल, मुंबई उत्तर पूर्वमधून मिहिर कोटेचा, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, बीडमधून पंकजा मुंडे, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, लातूरमधून सुधाकर श्रृंगारे, माढ्यातून रणजीतसिंह निंबाळकर, सांगलीतून संजयकाका पाटील यांना संधी देण्यात आली आहे.

कोणत्या उमेदवारांना मिळाली संधी, पाहा यादी

१.नंदुरबार – डॉ. हिना गावित

२,धुळे- सुभाष भामरे,

३.जळगाव- स्मिता वाघ

४.रावेत- रक्षा खडसे

५.अकोला-अनूप धोत्रे,

६. वर्धा- रामदास तडस

७. नागपूर- नितीन गडकरी

८.चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार

९.नांदेड- प्रतापराव चिखलिकर

१०. जालना- रावसाहेब दानवे

११.डिंडोरी- भारती पवार

१२.भिवंडी- कपिल मोरेश्वर पाटील

१३.मुंबई उत्तर- पियूष गोयल

१४.मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा

१५.पुणे- मुरलीधर मोहोळ,

१६.बीड- पंकजा मुंडे

१७.अहमदनगर- सुजख विखे पाटील

१८.लातूर- सुधाकर श्रृंगारे

१९.माढा- रणजीत सिंह निंबाळकर

२०.सांगली- संजयकाका पाटील

भाजप आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करेल अशी शक्यता होती. त्याप्रमाणे आज भाजपने उमेदवारी जाहीर केली असून महाराष्ट्रातून अनेक नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये १९५ उमेदवारांची नावे होती.महाराष्ट्रामध्ये जागावाटपावरुन भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरु होती. अद्याप या तिन्ही पक्षांमधील जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आलेला नाही. पण, भाजपकडून महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.