जागतिक महिला दिनी जिल्हास्तरीय कार्यक्र्मात महिलांबाबत आरोग्य योजना घडीपत्रकाचे विमोचन

0
3

गोंदिया : जिल्हा परिषद प्रशासनामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा त्यांनी केलेल्या गुणवत्तापुर्वक कामाबद्दल सत्कार करण्यात आला. सदर महिला सत्कार सोहळा कार्यक्रम स्व. यशवंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद गोंदिया येथे सोमवार (ता.11 मार्च) रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले , महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम व जिल्हा परिषदेचे सदस्य मा. छबुताई उके, मा. रचनाताई गहाणे, उषाताई मेंढे यांचे उपस्थीतीत संपन्न झाला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत ,बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर उपस्थित होते. आरोग्यसेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल परिचर्या व सुश्रुषा सेवेची जननी फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार सुद्धा वितरण करण्यात आले.
सदर दिनाचे महत्व समजुन जिल्हा आरोग्य विभागामार्फत महिला आरोग्य योजना घडीपत्रकाचे विमोचन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले , महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. सदर महिला आरोग्य योजना घडीपत्रकात प्रधानमंत्री मातृ वदना योजना, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया लाभ, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा, नवसंजीवनी आदिवासी भागातील मातृत्व अनुदान,मानवविकास योजने अंतर्गत बुडित मजुरी, माहेर घर ईत्यादी विविध योजनेची माहीती नमुद केली असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी या प्रसंगी दिली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली खोब्रागडे तर आभार डॉ.नितीन वानखेडे यांनी मानले. महिला आरोग्य योजना घडीपत्रक तयार करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हा माध्यम व विस्तार- अधिकारी प्रशांत खरात, अधिपरिचारिका कल्याणी चौधरी व सर्व योजना समन्वयक यांनी मोलाची कामगिरी केली आहे.यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.