ठाकरेंचे उमेदवार कोणत्या मतदारसंघात कुणाविरुद्ध लढणार?

0
9

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024) पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आतापर्यंत 21 उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT Candidate) आज उमेदवारांची दुसरी यादी (Second List) जाहीर केली असून यामध्ये चार नावांचा समावेश आहे. त्याआधी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून  उमेदवारांच्या पहिल्या यादीत 17 उमेदवारांची यादी (Lok Sabha Candidates list) जाहीर करण्यात आली होती. आतापर्यंत ठाकरे गटाने 21 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कोणत्या मतदासंघातून ठाकरेंचा कोणता उमेदवार लढणार, याबाबत सविस्तर वाचा.

कोणता उमेदवार कोणत्या मतदासंघातून लढणार?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये बहुचर्चित लढत असलेल्या कल्याण मतदारसंघातील (Kalyan Lok Sabha Constituency) उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या विरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हातकणंगलेमधून सत्यजित पाटील आणि पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर करण्यता आली आहे. तर नुकतेच उन्मेष पाटील यांच्यासोबत भाजपमधून ठाकरे गटात पक्षप्रवेश केलेले करण पवार यांना जळगावमधून लोकसभेचं तिकीट दिलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे 21 शिलेदार : 

 1. बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
 2. यवतमाळवाशिम – संजय देशमुख
 3. मावळ – संजोग वाघेरे-पाटील
 4. सांगली -चंद्रहार पाटील
 5. हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
 6. छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
 7. धाराशिव – ओमराजे निंबाळकर
 8. शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
 9. नाशिक – राजाभाई वाजे
 10. रायगड – अनंत गीते
 11. सिंधुदुर्गरत्नागिरी – विनायक राऊत
 12. ठाणे – राजन विचारे
 13. मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
 14. मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
 15. मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर
 16. परभणी – संजय जाधव
 17. मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
 18. वैशाली दरेकर : कल्याण
 19. सत्यजित पाटील : हातकणंगले
 20. करण पवार : जळगाव
 21. भारती कामडी : पालघर

उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

 

कोणत्या मतदारसंघात कुणाविरुद्ध लढणार?

मतदारसंघ महायुती
(भाजप, शिंदे आणि अजित)
महाविकास आघाडी
(UBT, Shard, Cong)
वंचित/बसप अपक्ष/इतर
1 नंदुरबार डॉ. हिना गावित गोवाल पाडवी
2 धुळे सुभाष भामरे अब्दुल रहमान
3 जळगाव स्मिता वाघ करण पवार
4 रावेर रक्षा खडसे संजय ब्राम्हणे
5 बुलडाणा प्रतापराव जाधव नरेंद्र खेडेकर
6 अकोला अनुप धोत्रे
7 अमरावती नवनीत राणा बळवंत वानखेडे आनंदराज आंबेडकर
8 वर्धा रामदास तडस अमर काळे
9 रामटेक राजू पारवे
10 नागपूर नितीन गडकरी विकास ठाकरे
11 भंडारागोंदिया सुनील मेंढे डॉ. प्रशांत पडोळे संजय कुंभलकर सेवक वाघाये
12 गडचिरोली-चिमूर अशोक नेते डॉ. नामदेव किरसान
13 चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार प्रतिभा धानोरकर
14 यवतमाळ – वाशिम संजय राठोड संजय देशमुख
15 हिंगोली हेमंत पाटील नागेश पाटील आष्टीकर डॉ. बी.डी. चव्हाण
16 नांदेड प्रताप पाटील चिखलीकर वसंतराव बळवंतराव चव्हाण
17 परभणी संजय जाधव
18 जालना रावसाहेब दानवे प्रभाकर बखले
19 औरंगाबाद चंद्रकांत खैरे
20 दिंडोरी डॉ. भारती पवार भास्करराव भगरे
21 नाशिक राजाभाई वाजे
22 पालघर भारती कामडी
23 भिवंडी कपिल पाटील
24 कल्याण श्रीकांत शिंदे वैशाली दरेकर
25 ठाणे राजन विचारे
26 मुंबई-उत्तर पियुष गोयल
27 मुंबई – उत्तर पश्चिम अमोल किर्तीकर
28 मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) मिहीर कोटेचा संजय दिना पाटील
29 मुंबई उत्तर मध्य अबुल हसन खान
30 मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे अनिल देसाई
31 दक्षिण मुंबई अरविंद सावंत
32 रायगड सुनील तटकरे अनंत गीते
33 मावळ श्रीरंग बारणे संजोग वाघेरे पाटील
34 पुणे मुरलीधर मोहोळ रविंद्र धंगेकर वसंत मोरे
35 बारामती सुुनेत्रा पवार सुप्रिया सुळे
36 शिरुर शिवाजी आढळराव पाटील डॉ. अमोल कोल्हे
37 अहमदनगर सुजय विखे पाटील निलेश लंके
38 शिर्डी सदाशिव लोखंडे भाऊसाहेब वाघचौरे
39 बीड पंकजा मुंडे
40 धाराशिव ओमराजे निंबाळकर
41 लातूर सुधाकर श्रृंगारे शिवाजीराव काळगे नरिसिंह उदगीरकर
42 सोलापूर राम सातपुते प्रणिती शिंदे राहुल काशिनाथ गायकवाड
43 माढा रणजितसिंह नाईक निंबाळकर रमेश बारसकर
44 सांगली संजयकाका पाटील चंद्रहार पाटील
45 सातारा मारुती जानकर
46 रत्नागिरी-सिंधुदुर्ग विनायक राऊत काका जोशी
47 कोल्हापूर संजय मंडलिक शाहू महाराज छत्रपती
48 हातकणंगले धैर्यशील माने सत्यजीत पाटील दादागौडा चवगोंडा पाटील