मांडवी समुद्रकिनार्‍यावर भला मोठा व्हेल मासा सापडला

0
5

रत्नागिरी ;- रत्नागिरी शहरानजीक असलेल्या मांडवी बंदर परिसरात भरतीच्या पाण्याबरोबर एक भला मोठा व्हेल मासा मृत अवस्थेत समुद्रकिनार्‍यावर आला. या मृत माशाला पहाण्यासाठी नेहमीप्रमाणेच गर्दी केली. गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत मासे समुद्रकिनार्‍यावर लागले आहेत. व्हेल मासा मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे का? हा संशोधनाचा विषय असला तरी मच्छिमार बांधव मात्र याबाबत चिंता व्यक्त करीत आहेत. समुद्रात खोलवर मोठे जहाज मार्गक्रमण करीत असतात त्यावेळी व्हेल माशाला दगाफटका होण्याचीही शक्यता असते. ज्यावेळी एखादे जहाज मार्गक्रमण करीत असते त्याचदरम्यान व्हेल मासा देखील जहाजाबरोबर धावण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यावेळी जहाजाच्या पुढे लावण्यात आलेले पाते त्यांच्या जीवाला धोका निर्माण करतात. शिवाय जहाजाच्या मागे असणारे पंखे देखील धोकादायक असतात. मनुष्य जीवावर प्रेम करणारा असा व्हेल मासा अशाच संकटात सापडला असावा, असेही म्हटले जात आहे.