मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आमिषाला बळी न पडता घराबाहेर पडा-प्रांताधिकारी मिरज  उत्तम दिघे

0
4

सांगली /तासगाव- स्वीप कार्यक्रमांतर्गत सेवाभावी संस्था व इतर सामाजिक उपक्रम राबविणारे विभागातील प्रतिनिधींची बैठक तहसीलदार सो तासगाव.यांचे दालनात आयोजित करण्यात आली होती.सुरुवातीला  तहसीलदार तथा 44 सांगली लोकसभा २८७ तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र रांजणे  यांनी उपस्थितांचे शाब्दिक स्वागत करून प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांताधिकारी मिरज  उत्तम दिघे यांनी देशातील मतदानाचे प्रमाण कमी असल्याने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निर्भयपणे व कोणत्याही आमिषाला बळी न पडता घराबाहेर पडावे.जास्तीत जास्त मतदारांनी सरकार स्थापनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. स्वीपचे नोडल अधिकारी श्री लावंड  तथा गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती तासगाव यांनी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम घेत असून त्यात नवमतदार संवादमेळावा,मानवी साखळी,रांगोळी,चित्रकला यांचा समावेश आहे.राष्ट्रीय टक्केवारी 67.40% असून ८० ते १००% मतदान होण्यासाठी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण प्रयत्न करावेत. श्री लावंड यांनी सर्वांचे आभार मानले.सदर कार्यक्रमास सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी सौ परनाकर ,पर्यवेक्षिका भोंगाळे व वेल्हाळ,तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.स्वीत पथक सदस्य रामचंद्र राठोड शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती तासगाव, सौ.शोभा जाधव शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती तासगाव.प्रवीण कांबळे. कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती,तासगाव.महावीर कांबळे मुकादम नगरपालिका तासगाव उपस्थित होते.