जात पडताोळणी समितीकरीता सामाजिक न्याय विभागाचा निर्णय
खेमेंद्र कटरे/ गोंदिया,दि.२२:: राज्यातील अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीमध्ये कार्यालयीन कामकाज सुरळित होणेकरिता राज्य पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक व पोलीस निरीक्षक अधिका-यांच्या सेवा करार पध्दतीने ठरवून दिलेल्या कामाकरिता घेण्यासाठी आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य,पुणे व लेखाधिकारी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे,यांच्या स्तरावर मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे या जातपडताळणी समितीमधील रिक्त पदावर आत्ता कंत्राटी पोलीसअधिकारी नियुक्तीचा मार्ग मोकळे करुन राज्यातील महायुती सरकारने नवीन पदभरतीची अपेक्षाच करु नका असेच स्पष्ट केले आहे.
सदर भरती संदर्सात भहआयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती,पुणे/ठाणे/पालघर/नाशिक/नाशिक-२/नंदुरबार/धुळे/ छत्रपती संभाजीनगर/किनवट/नागपुर/गोंदिया/अमरावती/यवतमाळ/गडचिरोली/चंद्रपूर यांना पत्र क्र.आस्था-२०२४/प्र.क्र.२६/पोलीस पदे/का-१/१३३६ दिनांक.२१/०५/२०२४ नुसार कळविण्यात आले आहे.