पोलीस वाहनाला ट्रकची धडक;अपघातात १मृत्यू ,६ जखमी

0
62
  • गोंदिया : गोंदियातील गोंदिया तिरोडा  रिंगरोडवरील व्दारकालॉनसमोरील रेल्वेचौकीजवळ मालवाहू ट्रक चालकाने गोंदिया पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला मागून धडक दिल्य़ाने या अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना आज २२ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.तर स्थानिक गुन्हे शाखेच्या गाडीचा नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर समोर उभे असलेल्या चार तरुणांना धडक दिली. यात मोटारयाकलस्वार एका तरुणांचा मृत्यू झाला असून साहिल कुडमेते असे त्शाचे नाव आहे. मृतक हा गोंदिया शहरातील एका कंपनीत जॉब करत होता. तो चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तर जखमी मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे आणि वाहन चालक मुरली पांडे हे जखमी आहेत.तर इतर तीन तरुण किरकोळ जखमी असून जखमीवर गोंदिया शहरातील सहयोग रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना 22 मे रोजी 11 वाजता घडली असून पोलीस वाहन वाहन क्रमांक एम.एच. 12 एस.क्यु. 1006 असे असून ट्रकचे नंबर वृत्त लिहीपर्यंत समोर आले नाही.