‘विको’चे अध्यक्ष यशवंत पेंढरकर यांचे निधन

0
4
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर : प्रसिद्ध उद्याोगपती आणि ‘विको’ कंपनीचे अध्यक्ष यशवंत केशव पेंढरकर यांचे शुक्रवारी सांयकाळी चार वाजता नागपूर येथील निवासस्थानी वृद्धपकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शुभदा, मुले अजय व दीप, मुलगी दीप्ती असा आप्त परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा शनिवार, २५ रोजी केशवायनम:, चिटणवीसमार्ग सिव्हील लाईन्समधील निवासस्थानाहून सकाळी ९.३० वा. निघेल व त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. एक सौम्य, शालीन व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची औद्याोगिक विश्वात ओळखले जाणारे यशवंत पेंढरकर यांनी कायद्याची पदवी (एलएलबी) घेतली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते विको समुहात रूजू झालेत. त्यांच्या कायदेविषयक अभ्यासाचा विको समुहाला फायदा झाला.ते २०१६ मध्ये विको कंपनीचे चेअरमन झाले. त्यांच्या नेतृत्वात कंपनीने काळानुरूप बदल करीत प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठलेत. त्याच्या कारकीर्दीतच कंपनीला ‘ब्रॅण्ड ऑफ द इअर २०२३’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासह निर्यातीशी संबंधित बरेच पुरस्कार त्यांच्या कार्यकाळात कंपनीला मिळालेत.