34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home शैक्षणिक मुंबई विद्यापीठाचा बीएमएस सत्र ६ चा निकाल ३० दिवसाच्या आत जाहीर;८०.८६ %...

मुंबई विद्यापीठाचा बीएमएस सत्र ६ चा निकाल ३० दिवसाच्या आत जाहीर;८०.८६ % विद्यार्थी उत्तीर्ण

0
38

blank

मुंबई : मुंबई विद्यापीठाने एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बीएमएस सत्र ६ या महत्वाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत ११,१८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.८६ एवढी आहे. विद्यापीठाने वाणिज्य व विज्ञान शाखेच्या निकालाबरोबरच व्यवस्थापन शाखेच्या निकालही ३० दिवसाच्या आत जाहीर केला आहे.

या परीक्षेत १६,११२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर १५,८६८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये ११,१८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर २६४८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल ८०.८६ टक्के एवढा लागला आहे. २४४ विद्यार्थी हे परीक्षेला अनुपस्थित होते. २५ विद्यार्थ्यांचे निकाल हे कॉपी प्रकरणामुळे राखीव ठेवण्यात आले आहेत. तर ११२९ विद्यार्थ्यांचे निकाल ते प्रथम किंवा द्वितीय वर्ष उत्तीर्ण नसल्याने राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध कारणांनी प्रवेश निश्चित (Confirm) न झाल्याने ८८० विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.

मूल्यांकन वेळेवर होण्यासाठी एक विशेष टीम कार्यरत होती. याला सर्व प्राध्यापक व प्राचार्यांचे सहकार्य मिळाले. तसेच कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू अजय भामरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी विशेष लक्ष दिले. तसेच निकाल जाहीर करण्यासाठी निकाल कक्षाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाणे व सिसीएफचे सिस्टीम ऑपरेशन ऑफिसर संजय बुगडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

एकही निकाल राखीव नाही

या परीक्षेत अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाईन उपस्थिती पद्धत यशस्वी झाली असून यामुळे एकाही विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला नाही.

विद्यापीठाने आजपर्यंत २०२४ च्या उन्हाळी सत्राचे ५८ निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

blank