धारावीत अग्नितांडव! भीषण आगीत ६ जण जखमी

0
4

 मुंबई,दि.२८ः- धारावी (Dharavi) येथे पहाटेच्या सुमारास एका गोदामाला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (fire brigade) १० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवलं असून आगीत ६ जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धारावीतील अशोक मिल कंपाउंड रोडवरील कला किला येथे ही आगीची घटना घडली आहे. या परिसरातील कमर्शियल गारमेंट, जिमला पहाटे पावणेचारच्या सुमारास आग लागली. ही आग जमिनीपासून गोदामाच्या वरील तीन मजल्यांपर्यंत पोहोचली होती. या घटनेत इमारतीमधील लाकडी साहित्य आणि फर्निचर जळाल्याची माहिती मिळत आहे.