पेट्रोल, डिझेलच्या दरांत घट

0
6

पीटीआय
नवी दिल्ली – पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे 89 पैशांनी आणि डिझेलच्या दरांत लिटरमागे 49 पैशांनी घट करण्याचा निर्णय इंधन कंपन्यांनी घेतला आहे. हे नवे दर आज (ता. 30) मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. गेल्या दोन महिन्यांत प्रथमच इंधनदरांत घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर आणि रुपया यांच्यातील विनिमय दरांत घट झाल्याने त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीमूल्यावर झाल्याचे भारतीय तेल कंपन्यांनी सांगितले. गेल्यावेळी 15 जूनला पेट्रोलचे दर 5 पैशांनी, तर डिझेलचे दर 1.26 रुपयांनी वाढले होते.