गोंदिया,दि.२९ः– राज्यात पुढील महिन्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभमीवर राज्य पोलिस दलातील काही बदलीसाठी पात्र ठरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश कालच राज्य गृहखात्याच्या सह सचिवांनी काढले असून संबंधितांना ताबडतोब बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश रवाना करण्यात आले आहेत.