महायुती 153 BJP 94 सेना (S) 30 NCP(AP) 29 OTH 12
मविआ 122 INC 43 सेना(U) 37 NCP(SP) 42
पक्षनिहाय कोण आघाडीवर? :
भाजप- 93
शिवसेना शिंदे गट – 26
राष्ट्रवादी अजित पवार गट – 21
काँग्रेस- 49
राष्ट्रवादी शरद पवार गट – 43
शिवसेना ठाकरे गट – 40
पहिली फेरी- कोण आघाडीवर?
बारामती – अजित पवार आघाडीवर
येवला – छगन भुजबळ पिछाडीवर
येवला – माणिकराव शिंदे आघाडीवर
ओवळा- माजिवडा –
कर्जत – रोहित पवार आघाडीवर
अहमदनगर – संग्राम जगताप आघाडीवर
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर
मावळ – सुनील शेळके आघाडीवर
दौंड – राहुल कुल आघाडीवर
पोस्टल मतमोजनी गोंदिया जिल्ह्ात महायुती ३ जागेवर आघाडी
गोंदिया – विनोद अग्रवाल आघाडीवर…
देवरी- संजय पुराम आघाडीवर
मोरगांव अर्जुनी- राजकुमार बडोलें आघाडीवर
तिरोडा- मतमोजनी सुरु व्हायची आहे.
भंडारा जिल्हा पोस्टल मतमोजनी
भंडारा- नरेंद्र पहाड़े आघाडीवर…
तुमसर- राजू कारेमोरे आघाडीवर
साकोली- नाना पटोलें आघाडीवर
महायुतीचे सरकार येणार
निकालावर मत व्यक्त करताना छगन भुजबळ म्हणाले, राज्याचा निकाल हा स्पष्ट आहे. अनेक सर्व्हे करणाऱ्या संस्थांनी जनतेचा कल सांगितला आहे. त्यामुळे राज्यात महायुती सरकार बनवणार आहे. कोण म्हणते बहुमतापेक्षा महायुतीला दहा जास्ती असेल, कोण म्हणते पन्नास जागा जास्त असतील, कोणी म्हणते पंचवीस जागा जास्त असेल. परंतु महायुतीचे सरकार बनवणार आहे. महाविकास आघाडीला जनतेने नाकारले आहे.
या मुद्यांवर मतदान
कोणत्या मुद्द्यावर निवडणूक झाली, त्यावर छगन भुजबळ म्हणाले, बटेंगे ते कटेंगे हा मुद्दा महाराष्ट्रात चाललेला नाही. परंतु राज्यात महायुतीची लोकप्रिय योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण चालली आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज हा विषय चालला आहे. मुलींना मोफत शिक्षणाला प्राधान्य मिळाले आहे. महायुती सरकारने गरिबांना अनेक चांगल्या योजना दिल्या आहे, त्या योजनेवर जनतेने महायुतीला मतदान केले आहे.
कागलमध्ये समरजित घाटगे आघाडीवर
कागलमध्ये पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार घटाचे समरजित घाटगे हे आघाडीवर असून हसन मुश्रीफ यांना धक्का बसला आहे.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर
वरळीमध्ये पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे, पहिला कल हाती आला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्घव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत पिछाडीवर
बारामतीची पोस्टल मतमोजणी सुरू झाली आहे. बारामतीत युगेंद्र पवार हे पोस्टल मतमोजणीत आघाडीवर आहेत. तर अजित पवार हे पिछाडीवर आहे. त्यामुळे अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
साकोलीमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात, नाना पटोले आघाडीवर
साकोलीमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिला कल हाती आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आघाडीवर आहेत.
साताऱ्यात पोस्टल मतमोजणीला सुरुवात, भाजपचे शिवेंद्र राजे भोसले आघाडीवर
साताऱ्यात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजपचे शिवेंद्र राजे भोसले आघाडीवर आहेत. सोलापूर तसेच नवी मुंबईतही मतमोजणीला सुरूवात झाली आहे.