गोंदिया २६,तिरोडा २२,अर्जुनी मोर २३ व आमगावमध्ये होणार मतमोजणीच्या २३ फेऱ्या

0
712

विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज – प्रजित नायर

         गोंदिया, दि.22 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान शांततेत पार पडले. आता 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार असून सदर मोतमोजणीमध्ये नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतमोजणीची कामे जबाबदारीने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी दिले.

          गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर शनिवार 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

        63-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी कृषि उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव येथे 14 ईव्हीएम मतमोजणी टेबलवरुन होणार आहे. 6 पोस्टल बॅलेट टेबल व 1 ईटीपीबीएस टेबल. यामध्ये 23 फेऱ्या होणार आहेत. यावेळी 120 अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

        64-तिरोडा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय आयटीआय तिरोडा येथे 20 ईव्हीएम मतमोजणी टेबलवरुन होणार आहे. यामध्ये 22 फेऱ्या होणार आहेत. यावेळी 18 मतमोजणी अधिकारी राहणार असून 150 मतमोजणी कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

        65-गोंदिया विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पॉलिटेक्निक कॉलेज फुलचूर पेठ गोंदिया येथे 14 ईव्हीएम मतमोजणी टेबलवरुन होणार आहे. 6 पोस्टल बॅलेट टेबल व 1 ईटीपीबीएस टेबल. यामध्ये 26 फेऱ्या होणार आहेत. यावेळी महसूल व इतर विभागाचे 200   अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

       तर 66-आमगाव विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय आयटीआय देवरी येथे होणार आहे. 14 ईव्हीएम मतमोजणी टेबलवरुन होणार आहे. यामध्ये 23 फेऱ्या आहेत. यावेळी 160 अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

        यावेळी गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रात कडेकोट पोलीस बंदोबस्त राहणार आहे.