5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा

0
277

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 8 दिवस उलटले असले तरी देखील अद्यापही राज्यात सरकार स्थापन झालं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असताना मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात निर्णय झालेला नाही. मात्र आता मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
शपथविधी सोहळा कधी? :
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 5 डिसेंबर 2024 ला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी मुंबईतील खास ठिकाण देखील निश्चित करण्यात आलं आहे. मुंबई येथील आझाद मैदानात महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी आझाद मैदानात संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र महायुतीने अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा केली नाही.

याशिवाय या शपथविधी सोहळ्यासाठी देशातील भाजपचे सर्व प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार आहेत. कारण या पार्श्वभूमीवर येत्या 2 किंवा 3 डिसेंबर 2024 रोजी भाजपच्या सर्व आमदारांची बैठक पार पडणार आहे. तसेच 5 डिसेंबरला महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी 2 किंवा 3 डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील महायुतीच्या दिग्गज नेत्यांशी संवाद साधणार आहेत.
दरम्यान, सर्व आमदारांना येत्या 5 डिसेंबर 2024 ला शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहावे अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईबाहेरील आमदारांनी मुंबईत येण्यासाठी तयार राहावे अशी सूचना देखील देण्यात आली आहे. तसेच महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यामध्ये जल्लोष करा असे आवाहन देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
त्यासोबतच प्रत्येक जिल्ह्यातून भाजप पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी देखील शपथविधीला उपस्थित राहतील. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पास देण्यात आलेल्या व्यक्तींनाच फक्त आझाद मैदानात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच महायुतीच्या शपथविधीसाठी विशेष पासेसची सुविधा असणार आहे.