वरोरा तालूक्यातील जवान अक्षय निखुरे शहिद

0
107

वरोरा : तालुक्यातील टेमुर्डा जवळील पिंपळगाव (मारोती) या छोट्याशा खेड्यातील दोन्ही भाऊ भारतीय सैन्यामध्ये सेवा करतात. अक्षय निखुरे यांचे वाहन खोल दरीत कोसळल्याने अपघात झाला. या वाहनांमध्ये जवळपास १८ जवान असून पाच जवान शहिद झाले. याबाबत रजेवर वर्धा येथील आलेल्या जवानांनी घरी येऊन (Jawan Akshay Nikhure) निखुरे कुटुंबाला सदर माहिती दिली.२६डिसेंबर सकाळी ११ वाजता पिंपळगाव ह्या स्वगावी शासकीय इतमात अंतिम संस्कार करण्यात  आले.

अक्षय दिगंबर निखुरे हे संत तुकडोजी महाविद्यालय येथे बारावी पर्यंत शिक्षण पुर्ण केले त्यानंतर वरोरा येथे बी.ए. फायनल ला शिक्षण घेत असतानाच भारतीय सैन्य दलात वयाच्या २१ व्या वर्षी सन २०१८ मध्ये रुजू झाले होते. त्याचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून वडील आणि आई दोघेही घरची चार एकर शेती करतात. अक्षयचे अपघाती निधन  झाल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज घरची परिस्थिती हलाखीची असताना आपले दोन्ही मुले भारतीय सैन्य दलात पाठवणाऱ्या या वडिलांचे कौतुक परिसरातील लोकांनी केले होते परंतु दुर्दैवाने त्याचे निधन झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळला.